The real 'Hoodibaba' motercycle will come in market soon, flying in the air
खरीखुरी 'हुडीबाबा' आली, हवेतही उडणारी By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:26 PM1 / 13साधारण 15 वर्षांपूर्वी बजाज कंपनीच्या डिस्कव्हर या मोटारसायकलची जाहीरात टीव्हीवर पाहिली असेल. हुडीबाबाच्या नावे ही जाहीरात होती. मोटारसायकल सुरु झाल्यावर ते पात्र अलगद काठीवर बसून हवेत कसे उडते हे या जाहिरातीत दाखविले होते. तेव्हा ही जाहिरात कमालीची लोकप्रिय झाली होती. आता खरीखुरी हवेत उडणारी आणि रस्त्यावर धावणारी 'हुडीबाबा' आली आहे. 2 / 13फ्रान्सची कस्टम ऑटोमोबाईल कंपनी lazareth ने ही हवेत उडू शकणारी मोटारसायकल बनविली आहे. 3 / 13 ही मोटारसायकल रस्त्यावरही धावू शकणार आहे, तसेच हेलिकॉप्टरसारखी हवेतही उडू शकणार आहे. 4 / 13कंपनीने या मोटारसायकलला LMV 496 नाव दिले आहे. 5 / 13या बाईकची खास बाब ही आहे की, राईड मोडवरून फ्लाईट मोडवर जाण्यासाठी केवळ 60 सेकंद लागतात. 6 / 13कंपनीने नुकतीय या उडत्या बाईकची चाचणी घेतली असून ही बाईक यशस्वीरित्या हवेत उडत असल्याचे दाखविले आहे. 7 / 13या बाईकला चार चाके आहेत. कंपनीने या बाईकमध्ये मसराटी कारचे 5.2 लीटरचे V8 इंजिन लावण्यात आले आहे. 8 / 13Lazareth LMV 496 च्या चारही चाकांना 96,000rpm जेटकॅट जेट टर्बाईन लावण्यात आले आहेत.9 / 13यामध्ये लावण्यात आलेले हायड्रॉलिक एक्यूटर्स चारही चाकांना जमिनीला समांतर वरच्या बाजुला वळवितात. 10 / 13बाईकच्या चेसीच्या मधोमधही दोन अतिरिक्त जेट लावण्यात आले आहेत, कारण बाईक जादा वजन घेऊन उडू शकेल. 11 / 13कंपनीच्या दाव्यानुसार ह बाईक एक बटन दाबताच गरम होऊन उडण्यासाठी तयार होते. यामध्ये 60 सेकंदाचा वेळ जातो. 12 / 13चाचणीवेळी कंपनीने 1 मीटर एवढ्या उंचीवर बाईक उडवून दाखविली आहे. या बाईकचे वजन केवळ 140 किलो आहे. तर फ्लाईट मोडवर बाईक 240 किलो वजन घेऊन उडू शकते13 / 13ही बाईक पॉलिस्टर आणि कार्बन फायबरच्या वापरातून बनविण्यात आली आहे. कंपनी या बाईकला दुबईतील ऑटो शो मध्ये दाखविणार आहे. या बाईकची किंमत 3.84 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications