Remember 'these' things if using a CNG car, otherwise...
सीएनजी कार वापरत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा... By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 12:10 PM1 / 6नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत्या किमती पाहता सध्या अनेकजणांचा सीएनजी कार खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येते. ग्राहकांना सीएनजी कारमध्ये कमी पैशांमध्ये जास्त मायलेज मिळत आहे. यामुळे भारतीय बाजारात सीएनजी कारची मागणी वाढली आहे.2 / 6जर तुम्ही देखील सीएनजी कार खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सीएनजी कारबद्दल काही माहिती देत आहोत. याचा तुम्हाला मोठा फायदा देखील होऊ शकतो आणि तुमच्या हजारो रुपयांची बचत देखील होऊ शकते. 3 / 6सीएनजी कारच्या मालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या कारला सीएनजी टाकी जोडलेली असते. त्यामुळे कार मालकांनी त्या टाकीची वेळोवेळी तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास त्रास होऊ शकतो आणि हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते.4 / 6सीएनजी कार उन्हात उभी करू नयेत. उन्हात पार्किंग केल्याने या कार्सच्या सीएनजी टाकीमध्ये भरलेला सीएनजी गॅस बाष्पीभवन होतो. त्यामुळे त्रास होऊ शकतो आणि हजारो रुपयांचे नुकसानही होऊ शकते.5 / 6सीएनजी कार्सच्या स्पार्क प्लगची नेहमी काळजी घेतली पाहिजे. स्पार्क प्लग हा कारचा महत्त्वाचा भाग आहे. त्यात थोडा दोष असला तरी तो तपासावा. तसे न केल्यास त्रास होऊ शकतो आणि हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते.6 / 6सीएनजी कार्समध्ये बसवलेल्या सीएनजी टाकीमधून गळती होत असेल तर ते हलके घेऊ नये. त्यामुळे त्रास होऊ शकतो आणि हजारो रुपयांचे नुकसानही होऊ शकते. सीएनजी टाकीमध्ये गळती झाल्यास ती तातडीने दुरुस्त करावी. आणखी वाचा Subscribe to Notifications