शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Suzuki डिझेल इंजिनमध्ये पुनरागमन करणार; ‘या’ कार होणार सादर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 5:33 PM

1 / 10
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलनेही काही ठिकाणी शंभरी ओलांडली आहे.
2 / 10
इंधनदरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच कार निर्माता कंपन्यांनाही बसत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि दुसरीकडे इंधनदरवाढीमुळे ऑटोमोबाइल क्षेत्राचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 10
देशात बीएस-६ निकष लागू केल्यानंतर देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने डिझेल इंजिनच्या कार बंद करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा डिझेल इंजिन सेगमेंटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
4 / 10
भारतीय ग्राहकांकडून डिझेल इंजिन कारला चांगली मागणी असल्यामुळे कंपनी आता पुन्हा एकदा BS6 निकषांनुसार नवीन १.५ लिटर DDiS डिझेल इंजिनवर काम करत आहे, असे म्हटले जात आहे.
5 / 10
नवीन डिझेल इंजिनवर कंपनीच्या हरियाणा येथील मानेसर कारखान्यात काम सुरू आहे. मात्र, याबाबत अधिक खुलासा करण्यात आलेला नाही. याशिवाय मायलेज वाढवण्यासाठी कंपनी माइल्ड हायब्रिड सिस्टिम देखील आणू शकते.
6 / 10
पुढील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये मारुती पुन्हा एकदा डिझेल इंजिन सेगमेंटमध्ये आपल्या कार आणणार आहे, असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी Brezza, Ertiga आणि XL6 या कार पुन्हा डिझेल इंजिनमध्ये सादर करणार आहे.
7 / 10
Maruti Suzuki XL6 ही एममपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) प्रकारातील लोकप्रिय कार कंपनीची बीएस6 डिझेल इंजिनमध्ये येणारी पहिली कार असेल. ही कार Auto Expo 2022 च्या काही दिवस आधी लाँच केली जाऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
8 / 10
Maruti Suzuki XL6 ही मारुती सुझुकीची प्रीमियम MPV आहे. ही कार अर्टिगावर आधारित असून, ६ सीटर मॉडलमध्ये उपलब्ध आहे. यानंतर मारुती सुझुकी Vitara Brezza आणि Ertiga या कारही डिझेल इंजिनमध्ये लाँच करणार आहे.
9 / 10
Vitara Brezza ही कंपनीची एक लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. तर, Ertiga ही एमपीव्ही प्रकारातील कार आहे. डिझेल कार्सच्या किंमती पेट्रोल व्हेरिअंटपेक्षा जवळपास ६० हजार ते १ लाख रुपयांनी जास्त असू शकतात, असे सांगितले जात आहे.
10 / 10
यामुळे आता ग्राहकांना पुन्हा एकदा मारुती सुझुकीच्या नवीन अद्ययावर डिझेल इंजिनचा आनंद घेता येईल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगMaruti Suzukiमारुती सुझुकी