शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Revolt RV400 चा जोरदार दुहेरी झटका; किंमतीत मोठी वाढ, बॅटरीची वॉरंटीही केली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 13:37 IST

1 / 7
Revolt RV400 Electric Bike Price Hike: स्वदेशी इलेक्ट्रीक बाईक उत्पादक कंपनी Revolt नं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीनं आपल्या Revolt RV400 Electric Bike ची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
2 / 7
Revolt च्या इलेक्ट्रीक बाईक या स्टायलिस्ट लूक आणि पॉवरफुस बॅटरीसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु आता कंपनीनं किंमत वाढवण्यासह बॅटरीवरील वॉरंटीही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाईक फुल चार्ज केल्यास 150 किमीपर्यंतची रेंज मिळत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
3 / 7
रिपोर्ट्सनुसार कंपनीनं Revolt RV400 च्या बॅटरीवरील वॉरंटी कमी करून सहा वर्षे केली आहे. यापूर्वी कंपनी बॅटरीसोबत आठ वर्षांची वॉरंटी देत होती. याशिवाय किंमतीतही १८ हजार रुपयांची वाढ करण्यात आलीये.
4 / 7
यापूर्वी या बाईकची एक्स शोरूम किंमत 1,07,000 रुपये होती. तर निरनिराळ्या राज्यांकडून मिळणाऱ्या सब्सिडीनंतर याची किंमत एक लाखापेक्षा कमी होत होती. परंतु आता या बाईकची किंमत 1,25,000 रुपये इतकी झाली आहे.
5 / 7
Revolt RV400 मध्ये 3.24kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आलीये. ही बॅटरी 3kW इलेक्ट्रीक मोटरनं जोडण्यात आली आहे. यामध्ये Eco, Normal, Sports असे तीन मोड देण्यात आलेत.
6 / 7
स्पोर्ट मोडमध्ये ही बाईक 85 kmph चा टॉप स्पीड देते. तर इको मोड हा अधिक रेंजसाठी देण्यात आला आहे. फुल चार्जमध्ये इको मोड सिलेक्ट केल्यास ही बाईक 150 किमीपर्यंत रेंज देते. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही बाईक पूर्ण चार्ज होण्यासाठई 4.5 तासांचा कालावधी लागतो.
7 / 7
स्पोर्ट मोडमध्ये ही बाईक 85 kmph चा टॉप स्पीड देते. तर इको मोड हा अधिक रेंजसाठी देण्यात आला आहे. फुल चार्जमध्ये इको मोड सिलेक्ट केल्यास ही बाईक 150 किमीपर्यंत रेंज देते. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही बाईक पूर्ण चार्ज होण्यासाठई 4.5 तासांचा कालावधी लागतो.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनIndiaभारत