Rolls Royce Spectre: Rolls Royce's first EV car launched in India, 530km range; Know the price...
भारतात लॉन्च झाली Rolls Royce ची पहिली EV कार, 530km रेंज; जाणून घ्या किंमत... By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 6:41 PM1 / 5 Rolls Royce Spectre Launch: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या EV गाड्या बाजारात आणत आहेत. या सेगमेंटमध्ये आता एका अल्ट्रा लक्झरी कारची एन्ट्री झाली आहे. लक्झरी गाड्या बनवणाऱ्या Rolls-Royce ने आपली Specter EV भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. 2 / 5 या कारची किंमत 7.5 कोटी रुपये (एक्स-शोरुम) ठेवण्यात आली आहे. ही टू-डोअर इलेक्ट्रिक कूप भारतातील सर्वात महागडी ईव्ही आहे. स्पेक्टरद्वारे देशातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात रोल्स रॉइसचा प्रवेश झाला आहे.3 / 5 स्पेक्टरमध्ये 102kWh बॅटरी पॅक आहे, जी प्रत्येक एक्सलवर दोन इलेक्ट्रिक मोटर्सला जोडलेली आहे. याची मोटर 585bhp पॉवर आउटपुट आणि 900Nm टॉर्क जनरेट करते. स्पेक्टर्सची बॅटरी 195 किलोवॅटच्या चार्जरने केवळ 34 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.4 / 5 तसेच, 50kW DC चार्जरद्वारे ही 95 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज केले जाऊ शकते. Rolls-Royce चा दावा आहे की, Specter 530 km ची रेंज देऊ शकते. तसेच, ही अवघ्या 4.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडण्यास क्षमता आहे.5 / 5 स्पेक्टरचे वजन 2,890 किलो असून, ही रोल्स रॉइसच्या ऑल अॅल्युमिनियम स्पेसफ्रेम प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. हे लक्झरी आर्किटेक्चर म्हणून प्रसिद्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर घोस्ट, कुलीनन आणि फँटमसारख्या गाड्याही तयार करण्यात आल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications