शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 9:48 PM

1 / 8
Rolls-Royce Cullinan Series II: रॉल्स रॉयस कंपनीच्या गाड्यांची गणना जगातील सर्वात महागड्या गाड्यांमध्ये केली जाते. तुम्हाला सर्व कंपन्यांच्या महागड्या गाड्या पाहायला मिळतील, पण Rolls-Royce फार क्वचित दिसेल. त्यामुळेच या गाड्यांबाबत भारतीयांच्या मनात खुप उत्सुकता असते.
2 / 8
दरम्यान, आता Rolls-Royce ने भारतीय बाजारपेठेत Cullinan Series II ची लॉन्च केली आहे. ही कार मे 2024 मध्ये जागतिक बाजारपेठेत लॉन्च झाली होती. आता ही लक्झरी कार भारतातही दाखल झाली आहे.
3 / 8
Rolls-Royce Cullinan ची किंमत- सुपर लक्झरी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी रोल्स रॉयसने या कारच्या स्टाइलमध्ये अनेक बदल केले आहेत. या कारच्या इंटिरिअरमधील बदलांमुळे ही कार नव्या लूकसह बाजारात दाखल झाली आहे.
4 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, Rolls-Royce Cullinan Series II च्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.50 कोटी रुपये आहे. तर Black Badge Cullinan एडिशनची एक्स-शोरूम किंमत 12.25 कोटी रुपये आहे.
5 / 8
या मॉडेलमध्ये काय खास आहे? या रोल्स रॉयस कारमध्ये पहिल्यांदाच पॅन्थिऑन ग्रिलचा वापर करण्यात आला आहे. या कारच्या फिचर्सबद्दल सांगायचे तर, या लक्झरी वाहनात नवीन एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स बसवण्यात आले आहेत. या कारमधील हेडलाइट्सही नव्याने डिझाइन करण्यात आले आहेत.
6 / 8
Rolls-Royal Cullinan 23 इंच चाकांसह येते, ज्यात नवीन 7 स्पोक व्हील डिझाइन आहे. यासोबतच कारच्या सर्व चाकांमध्ये कंपनीचा ट्रेडमार्क RR लोगोही लावण्यात आला आहे. कंपनीने या कारचा मागील भाग मिरर फिनिश स्टेनलेस स्टीलने बनवला आहे.
7 / 8
या रोल्स-रॉयस कलिनन कारच्या डॅशबोर्डमध्ये फूल लेंथ ग्लास पॅनेल दिला आहे. यापूर्वी कंपनीने स्पेक्टर मॉडेलमध्ये याचा पहिल्यांदा वापर केला होता. यासोबतच या कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी ड्युअल स्क्रीन सेटअप लावण्यात आला आहे.
8 / 8
Rolls-Royce Cullinan मध्ये कंपनीने पॉवरट्रेन पूर्वीप्रमाणेच ठेवली आहे. या कारमध्ये 6.75-लिटर, ट्विन-टर्बोचार्ज्ड V12 इंजिन वापरण्यात आले आहे. हे या कारला 600 bhp ची पॉवर आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते. Rolls-Royce Cullinan च्या मागील मॉडेलची किंमत 6.95 कोटी रुपये होती. आता नवीन अपडेट्समुळे ही कार 3.55 कोटींनी महागली आहे.
टॅग्स :Rolls-Royceरोल्स-रॉईसcarकारAutomobileवाहन