शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नेक्सॉन ईव्हीनंतरची टाटाची कार कशी असेल? गोल गोल फिरणारी सीट; Skydome व्ह्यू, पहा नवी Tata Avinya

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 4:58 PM

1 / 7
टाटा मोटर्सने आपली नेक्स्ट जनरेशन कॉन्सेप्ट इलेक्ट्रीक कार Tata Avinya चा पहिला लुक आज जगाला दाखविला. या कारचे फिचर्स एवढे भारी आहेत की ती एक यानच वाटते. एलईडी डीआरएल लाईटवरून बनविलेला टाटाचा लोगो आणि ती कार भन्नाट वाटते.
2 / 7
टाटा मोटर्स पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEM) ने ही नवीन कार Gen3 आर्किटेक्चरवर विकसित केली आहे. हे प्युअर इलेक्ट्रिक व्हेईकल प्लॅटफॉर्म टाटाच्या भविष्यातील सर्व वाहनांचा आधार असेल.
3 / 7
Tata Avinya हे नाव संस्कृत भाषेतून आले आहे. अविन्या म्हणजे नावीन्य. तसेच या नावात IN देखील येतो. जे टाटांची भारताप्रती असलेली बांधिलकी दर्शवते. त्याच्या नावाप्रमाणेच त्याच्या रचनेतही खूप नावीन्यपूर्ण काम करण्यात आले आहे.
4 / 7
लुक बोल्ड किंवा स्पोर्टीपेक्षा वेगळा व्हायब्रंट करण्यात आला आहे, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. कारचे कर्व्ह Catamaran पासून प्रेरित डिझाइन आहे. स्कायडोम व्ह्यू त्याच्या समोरच्या विंड-स्क्रीनवरून दिसतो.
5 / 7
या कारमध्ये कंपनीने समोरच्या दोन्ही सीट रिव्हॉल्व्हिंग केल्या आहेत. या सीट्सनुसार कारमधील लेग स्पेसची विशेष काळजी घेण्यात आली आहे. तर समोरच्या दोन आसनांच्यामध्ये हँडरेस्टवर अरोमा डिफ्यूझर देण्यात आला आहे.
6 / 7
कंपनीने नवीन Tata Avinya मध्ये बटरफ्लाय डोअर्स दिले आहेत. म्हणजे यामध्ये समोरचे दोन्ही दरवाजे समोरच्या दिशेने उघडतील आणि मागील दोन्ही दरवाजे मागील बाजूस उघडतील.
7 / 7
या कारमध्ये हॅचबॅक, एमपीव्ही आणि एसयुव्ही क्रॉसओव्हरचे फ्युजन आहे. ती प्रीमियम हॅचबॅक सारखी दिसते, परंतु MPV सारखी कार्यक्षमता आहे आणि SUV क्रॉसओवर म्हणून डिझाइन केलेली आहे.
टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कार