5 नोव्हेंबरला लॉन्च होणार Royal Enfield ची नवीन दमदार बाईक, पाहा फिचर्स अन् किंमत... By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 6:46 PM
1 / 5 Royal Enfield Bear 650 Expected Price: भारतातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Royal Enfield च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक दमदार बाईक्स आहेत. आता Royal Enfield ने आपली नवीकोरी बाईक Bear 650 आणली आहे. येत्या 5 नोव्हेंबर रोजी ही नवी नबाईक लॉन्च होईल. ही बाईक इटलीच्या मिलान शहरात EICMA मोटर शोमध्ये सादर केली जाणार आहे. 2 / 5 कशी आहे Royal Enfield Bear 650 रॉयल एनफील्ड बेअर 650 ची क्रेझ लोकांमध्ये खूप दिवसांपासून सुरू आहे. जवळपास दोन वर्षांपासून लोक या बाईकच्या लॉन्चची वाट पाहत आहेत. ही बाईक जागतिक बाजारपेठेत पाच कलर व्हेरियंटसह येणार आहे. ही बाईक इंटरसेप्टर 650 सारख्या 650 सीसी प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या नवीन मोटरसायकलमध्ये इंटरसेप्टर 650 प्रमाणेच इंजिन आणि चेसिस असेल, परंतु सस्पेंशन आणि चाके वेगळी असतील. 3 / 5 बेअर 650 डिझाइन रॉयल एनफिल्डची ही नवीन बाईक 60च्या दशकातील स्क्रँबलरप्रमाणे डिझाइन करण्यात आली आहे. या बाईकच्या पुढील बाजूस 19-इंच स्पोक्ड व्हील आहेत, तर मागील बाजूस 17 इंच चाक वापरण्यात आले आहे. या बाईकला 184 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स देण्यात मिळेल. Bear 650 च्या सीटची लांबी 830 mm आहे, जी सर्व 650 cc मॉडेल्समध्ये देऊ केलेली सर्वात लांब सीट आहे. 4 / 5 पॉवर अन् परफॉर्मन्स Royal Enfield Bear 650 मध्ये 648 cc ऑईल कूल्ड आणि एअर कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 7,150 rpm वर 47 bhp ची पॉवर अन् 5,150 rpm वर 56.5 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या बाईकमधील मोटर 6-स्पीड गिअर बॉक्सने सुसज्ज आहे. Bear 650 ला स्क्रॅम्बलरसारखा रुंद हँडलबार देण्यात आला आहे. ही बाईक ड्युअल चॅनल एबीएसने सुसज्ज आहे. या बाईकमध्ये USB टाइप C चार्जिंग पोर्टदेखील आहे. 5 / 5 Bear 650 ची किंमत ? रॉयल एनफील्ड बेअर 650 ची किंमत ही बाईक लॉन्च करतानाच समोर येईल. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नवीन बाईकची एक्स-शोरूम किंमत 3.5 लाख रुपयांच्या आसपास असेल. या बाईकला टक्कर देऊ शकेल अशी कोणतीही बाइक सध्या बाजारात नाही. आणखी वाचा