शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Royal Enfield Classic 350 वर बंपर ऑफर, 2 लाखांची बुलेट फक्त 60 हजारात; पहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:48 PM

1 / 5
नवी दिल्ली: Royal Enfield Classic 350 ही भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय क्रूझर बाइक आहे. यामध्ये तुम्हाला दमदार इंजिनसोबत आरामदायी प्रवास आणि उत्तम मायलेज मिळतो. याशिवाय, यात कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. ही क्रूझर बाईक कंपनीने ₹ 1.90 लाखांच्या एक्स-शोरूम किंमतीसह बाजारात आणली आहे. कंपनीने त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत ₹ 2.21 लाख ठेवली आहे. जर तुमचे बजेट यापेक्षा कमी असेल, तर तुम्ही अनेक ऑनलाइन सेकंड हँड बाइक खरेदी आणि विक्री करणार्‍या वेबसाइटवरून ही बाईक कमी किंमतीत खरेदी करू शकता.
2 / 5
QUIKR वेबसाइटवर ऑफर: रॉयल एनफील्ड क्लासिक 350 क्रूझर बाईक QUIKR वेबसाइटवर अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही या बाईकचे 2018 मॉडेल येथून ₹ 51,000 मध्ये खरेदी करू शकता. या खरेदीवर कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर दिली जात नाही.
3 / 5
BIKE4SALE वेबसाइटवर ऑफर: BIKE4SALE वेबसाइटवरून Royal Enfield Classic 350 क्रूझर बाईक अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही या बाईकचे 2013 चे मॉडेल येथून ₹ 60,000 मध्ये खरेदी करू शकता. या खरेदीवर कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर दिली जात नाही.
4 / 5
OLX वेबसाइटवर ऑफर: रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 क्रूझर बाईक OLX वेबसाइटवरून अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही या बाईकचे 2012 मॉडेल येथून ₹ 60,000 मध्ये खरेदी करू शकता. या खरेदीवर कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर दिली जात नाही.
5 / 5
Royal Enfield Classic 350 चे स्पेसिफिकेशन्स: Royal Enfield Classic 350 क्रूझर बाईकमध्ये 349.34 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 20.21 PS ची कमाल पॉवर आणि 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह येते. या बाईकमध्ये तुम्हाला 40.8 kmpl चा मायलेज मिळेल.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डAutomobileवाहन