Royal Enfield concept kx unveiled at eicma 2018
रॉयल एनफिल्डने सादर केली Concept KX बाइक सादर, बघा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 1:57 PM1 / 8Royal Enfield ने इटलीतील मिलान शहरात सुरु असलेल्या EICMA 2018 मोटरसायकल शोमध्ये नव्या ट्विन सिलेंडर Concept KX बाइकवरुन पडदा उठवला आहे. Royal Enfield Concept KX ही बाइक कंपनीने १९३८ साली लॉन्च केलेल्या लेजंडरी बाइक Royal Enfield KX ला ट्रिब्यूट देण्यासाठी सादर केली आहे. Royal Enfield KX चं डिझाइन हे जुन्या बाइकने प्रेरित आहे. 2 / 8इंजिन - रॉयन एनफिल्डच्या जुन्या केएक्स बाइकमध्ये ,140cc V-Twin इंजिन दिलं गेलं होतं आणि कॉन्सेप्ट केएक्समध्ये नवीन वी-ट्विन इंजिन दिलं गेलं आहे. पण जुन्या बाइकमध्ये एअर-कुल्ड मोटार होती, तर नव्या बाइकमध्ये ऑईल कूल्ड यूनिट दिलं गेलं आहे. 3 / 8पॉवर - कंपनीने नव्या मोटरबाबत काहीही माहिती शेअर केलेली नाही. पण इंजिनावर दिसत असलेल्या ८३८ बॅचवरुन हे मानलं जात आहे की, हे 838cc लिक्विड-कूल्ड इंजिन असेल. 4 / 8लूक - बॉबर स्टाइल असलेल्या या बाइकमध्ये रेट्रो लूक असलेलं फ्यूअल टॅंक दिली गेली आहे. नव्या बाइकला कॉपर फिनिशसोबत हिरव्या रंगात सादर केलं आहे. याच्या इंजिन आणि ड्यूल एक्झॉस्टवर ब्लॅक आणि ब्रॉन्ज फिनिश आहे. सीट आणि हॅंडलबार ग्रिप्सवर लेदर फिनिश आहे. 5 / 8मॉडर्न टच - कॉन्सेप्ट केएक्स आणि जुन्या लेजंडरी बाइकमध्ये अनेक गोष्टी सारख्याच आहेत. पण नव्या बाइकला जरा मॉडर्न टच देण्यात आला आहे. यात अलॉय व्हिल्स, हेडलॅम्प आणि टेल लॅम्पसाठी एलईडी लायटिंग, फूल डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर यांचाही समावेश आहे.6 / 8फोर्क्स आणि डिस्क - नव्या बाइकमध्ये समोरच्या बाजूने गर्डर-टाइप फोर्क्स आणि मागच्या बाजूने मोनोशॉक दिलं गेलं आहे. समोर ट्विन डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये एक डिस्क ब्रेक आहे. 7 / 8डिझाइन कॉन्सेप्ट - रॉयल एनफिल्ड कॉन्सेप्ट केएक्स बाइक एक डिझाइन कॉन्सेप्ट आहे आणि आता या बाइकचं प्रॉडक्शन होणार नाहीये. पण असे मानले जात आहे की, भविष्यात कंपनी या बाइकची फ्लॅगशिप बाइक सादर करुन शकते.8 / 8Royal Enfield KX सर्वात पावरफुल बाइक - १९३८ मध्ये लॉन्ज झालेल्या लेजंडरी बाइक Royal Enfield KX मध्ये १, १४० सीसीचं इंजिन देण्यात आलं होतं. ही कंपनीची सर्वात शक्तीशाली बाइक होती. या बाइकची टॉप स्पीड १२९ किमी प्रति तास होती. आणखी वाचा Subscribe to Notifications