शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Royal Enfield च्या नव्या Classic 350 नं लाँच होताच केला वर्ल्ड रेकॉर्ड; Guinness Book मध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 12:25 PM

1 / 12
Royal Enfield च्या बाईकचे अनेक चाहते आहेत. रॉयल एन्फिल्ड प्रेमींना प्रतीक्षा होती ती म्हणजे नव्या Classic 350 च्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलची. काही दिवसांपूर्वीच एका व्हर्चुअल इव्हेंटद्वारे ही बाईक लाँच करण्यात आली आणि लाँचदरम्यानच या बाईकनं एक विक्रम आपल्या नावे करून घेतला.
2 / 12
1 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बारा दरम्यान सुरू असलेल्या लाईव्ह स्ट्रिमदरम्यान एकू 19,564 व्ह्यूवर्स मिळाले होते. त्यानंतर रॉयल एन्फिल्डनं 13,779 लाईव्ह व्ह्यूवरशिपचा रेकॉर्ड तोडत गिनिज बुक मध्ये विक्रम नोंदवला. तर दुसरीकडे या इव्हेंटच्या लाईव्ह प्रक्षेपणाच्या प्रेक्षकांची संख्या लाखोंच्या पुढे गेली होती.
3 / 12
ज्यावेळी Royal Enfield ची ही बाईक लाँच केली जात होती, त्यावेळी या बाईकच्या लाँचचं लाईव्ह स्ट्रिमिंग युट्यूबद्वारे करण्यात येत होतं. यावेळी YouTube वर सर्वात जास्त लाईव्ह व्ह्यूवरशिप काऊंटमध्ये कंपनीच्या नावाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book) करण्यात आली आहे. या बाईक लाँचचं लाईव्ह स्ट्रिमिंग सर्वाधिक लोकांनी पाहिलं आहे.
4 / 12
कंपनीनं व्हर्च्युअल इव्हेंट दरम्यान या बेस्ट सेलिंग बाईकचं नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केलं. नवीन Classic 350 रेडडिच, हेलकॉन, सिग्नल, डार्क आणि क्रोमसह एकूण पाच ट्रिममध्ये ऑफर करण्यात आली आहे.
5 / 12
ज्या ग्राहकांना ही बाईक बुक करायची असेल त्यांना ती कंपनीच्या डीलरशीपमधून किंवा ऑनलाइन वेबसाईटवरून बुक करता येणार आहे. या बाईकसह कंपनी तीन वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि 1 वर्षांचा रोड साईड असिस्टंटही देत आहे.
6 / 12
नवी Classic 350 ही कंपनीच्या J मॉड्युलर आर्किटेक्चरवर बेस्ड आहे. यावर कंपनीनं नुकतीच सादर केलेली मेट्योर 350 देखील तयार केली आहे. Classic 350 मध्ये कंपनीनं 349cc क्षमतेच्या नव्या फ्युअल इंजेक्टेट इंजिनचा वापर केला आहे.
7 / 12
हे इंजिन 20.2bhp ची पॉवर आणि 27Nm चा टॉर्क जनरेच करतं. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह येतं. तसंच ही बाईक सिंगल आणि ड्युअल सीट व्हेरिअंटमध्ये येते.
8 / 12
कंपनीनं या बाईकच्या लूकमध्येच नाहीतर याच्या मेकॅनिज्म आणि तंत्रज्ञानातही बदल केला आहे. ही बाईक यापूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक चांगली बनते. नव्या क्लासिक 350 मध्ये कंपनीनं पायलेट लॅपसह नवे हेडलँप, अपडेटेड फ्युअल टँक ग्राफिक्स, नव्या डिझाईनचा एक्झॉस्ट आणि टेल लाईट दिले आहेत.
9 / 12
याशिवाय कंपनीनं या बाईकमध्ये आरामदायक सीटही दिली आहे, जी रायडरसह पिलन रायडरलाही कम्फर्ट देतो. या बाईकचा हेडलँप यापूर्वीच्या बाईकप्रमाणेच आहे. परंतु ग्रिप्स, स्विच क्युब्स, इन्फो स्विच आणि ओवल मास्ट सिलिंडरमध्ये मॉडिफिकेशनसह अॅर्गोनॉमिक्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
10 / 12
आणखी फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर यात ब्लूटूथ बेस्ड ट्रिपर नेव्हिगेशनही देण्यात आलं आहे, जे डेडिकेटेड TFT डिस्प्ले डिव्हाईससोबत येतं. यामध्ये ग्राहकांना गुगल नेव्हिगेशनही मिळतं, जे यापूर्वी Mateor 350 मध्ये पाहण्यास मिळालं होतं.
11 / 12
अन्य खास फीचर बाबत सांगायचं झालं तर यात इंटिग्रेटेड इग्निशन, स्टेअरिंग लॉक, एलसीडी इन्फो पॅनलसोबत सेमी डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि युएसबी चार्जर दिला आहे.या बाईकच्या सुरूवातीच्या मॉडेलची किंमत 1,84,374 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे.
12 / 12
या बाईकच्या सुरूवातीच्या मॉडेलची किंमत 1,84,374 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी निश्चित करण्यात आली आहे. आणखी फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर यात ब्लूटूथ बेस्ड ट्रिपर नेव्हिगेशनही देण्यात आलं आहे, जे डेडिकेटेड TFT डिस्प्ले डिव्हाईससोबत येतं. यामध्ये ग्राहकांना गुगल नेव्हिगेशनही मिळतं, जे यापूर्वी Mateor 350 मध्ये पाहण्यास मिळालं होतं.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डYouTubeयु ट्यूब