royal enfield himalayan launched in india and know about price and other specification
Royal Enfield Himalayan 2021 भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स By देवेश फडके | Published: February 17, 2021 11:24 AM1 / 10धडकी भरवणारा आवाज, दमदार इंजिन, स्टाइलिश लूक यांसह अनेक कारणांसाठी अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आणि तरुणाईच्या गळ्यातील ताइत झालेल्या Royal Enfield ने आपली नवीन Himalayan बाइक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. (royal enfield himalayan launched in india)2 / 10भारतातील डिलर्सकडे Royal Enfield Himalayan उपलब्ध करण्यात आली आहे. ही बाइक ६ रंगात उपलब्ध करण्यात आली असून, रंगांच्या वैशिष्ट्यांनुसार याची किंमत ठरवण्यात आली आहे. 3 / 10नवीन Royal Enfield Himalayan मिराज सिल्व्हर, ग्रेवल ग्रे, लेक ब्लू, रॉक रेड, ग्रेनाइट ब्लॅक आणि पाइन ग्रीन या सहा पर्यांयांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.4 / 10भारतात लॉन्च करण्यात आलेल्या Royal Enfield Himalayan ची एक्सशोरूम किंमत २ लाख ३६ हजार रुपयांपासून ते २ लाख ४४ हजार रुपयांपर्यंत आहे. 5 / 10नवीन रॉयल एनफिल्ड हिमालय बाइकच्या मिराज सिल्वर रंगाच्या पर्यायाची किंमत २,३६,२८६ रुपये, ग्रेवल ग्रेची किंमत २,३६,२८६ रुपये, लेक ब्लूची किंमत २,४०,२८५ रुपये, रॉक रेडची किंमत २,४०,२८५ रुपये, पाइन ग्रीनची किंमत २,४४,२८४ रुपये, तर ग्रेनाइट ब्लॅकची किंमत २,४४,२८४ रुपये आहे. 6 / 10हिमालयनला आता मेक इट युअर्स – एमआयवायची जोड मिळाली आहे. नवीन हिमालयनमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन पॉड, रॉयल एनफिल्ड ट्रिपर, सीट, रिअर कॅरिअर, फ्रंट रॅक व नवीन विंडस्क्रिनसह अद्ययावत सुधारणा करण्यात आल्या आहेत. 7 / 10रॉयल एनफिल्ड या आघाडीच्या बाइक निर्माता कंपनीने हिमालयन श्रेणीतील दमदार बाइक सन २०१६ मध्ये प्रथम लॉन्च केली होती. गेल्या ५ वर्षांत मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आता अद्ययावत, अधिक सक्षम आणि आरामदायी सुविधांसह नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. 8 / 10युरोप, अमेरिका, लॅटिन अमेरिका व आशियासह विविध देशांमध्ये ही बाइक सादर करण्यात आली आहे. रायडर्सच्या अभिप्रायासह सातत्याने हिमालयनला डिझाइन व कार्यक्षमतेसह सर्वसमावेशक केले आहे आणि एकूण राइड अनुभव सुधारण्यात आला आहे, असे रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद के. दसारी यांनी यावेळी बोलताना सांगितले.9 / 10Royal Enfield Himalayan 2021 मध्ये ४११ सीसीचे सिंगल सिलेंडर, ऑइल कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन २४.३ बीएचपी आणि ३२ एनएम टॉर्क जनरेट करते. या बाइकला ५ गिअर देण्यात आली आहे. तसेच या बाइकच्या फ्रंट आणि रिअर व्हिल्सना डिस्क ब्रेक आणि ड्युअल एबीएस देण्यात आले आहेत.10 / 10हिमालयनला जागतिक मोटरसायकल तज्ज्ञांनी अस्सल क्षमतापूर्ण साहसी टूररचा दर्जा दिला आहे. नवीन हिमालयनमध्ये गुगल मॅप्सचा ऑप्शन देण्यात आला आहे. बाइकला आता स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची सोय कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications