शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त लूक, कूल फीचर्स; Royal Enfield नं लाँच केली Himalayan Scram 411

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 4:43 PM

1 / 7
आपल्या रेट्रो लुकसाठी प्रसिद्ध असलेल्या रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) कंपनीनं आपली बहुप्रतीक्षीत रॉलय एनफिल्ड स्क्रॅम 411 (Royal Enfield Scram 411) मंगळवारी लाँच केली. या बाईकची स्पर्धा आका येझदी स्क्रॅम्बलर (Yezdi Scrambler) आणि येझदी अॅडव्हेन्चर (Yezdi Adventure) या बाईक्सशी होईल.
2 / 7
रॉयल एनफिल्डनं ही बाईक 411cc सिंगल सिलिंडर एअर कुल्ड SOHC इंजिनसोबत लाँच केली आहे. हे इंजिन हिमालयनमध्येही (Royal Enfied Himalayan) वापरण्यात आलं आहे. हे इंजिन 24.3ps ची पॉवर आणि 32Nm चा टॉर्क जनरेट करतं.
3 / 7
या बाईकची एक्स शोरुम किंमत 2.03 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या प्राईज टॅगमध्ये ही बाईक Yezdi Scrambler आणि Honda CB350RS या बाईक्सशी स्पर्धा करेल.
4 / 7
Royal Enfield Scram 411 मध्ये 19 इंचाचे व्हिल्स देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे ही बाईक पहिल्यापेक्षा अधिक रोड फोकस्ड दिसून येते. या बाईकमध्ये टॉल विंड स्क्रीनचा वापर करण्यात आलेला नाही.
5 / 7
बाईकमध्ये फ्रन्टला 41mm फोर्क आणि रिअरला मोनोशॉक देण्यात आले आहेत. सीटची उंची हिमालयनच्या तुलनेत कमी आहे. वजनाच्याबाबतही स्क्रॅम 411 रॉयल एनफील्ड हिमालयन (Royal Enfield Himalayan) च्या तुलनेत कमी आहे.
6 / 7
ब्रेकिंगसाठी या बाईकमध्ये 300mm डिस्क फ्रन्ट आणि 240mm डिस्क रिअर देण्यात आलेत. याशिवाय यामध्ये ड्युअल चॅनल ABS चा वापरही करण्यात आलाय. याशिवाय स्क्रॅमची फ्युअल टँक क्षमता 15 लीटर आहे.
7 / 7
स्क्रॅम ग्राहकांना सहा रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. यामध्ये ग्रॅफाईट ब्लू, ग्रॅफाईट येल्लो, ब्लेजिंग ब्लॅक, स्कायलाइन ब्लू, सिल्व्हर स्पिरिट आणि व्हाइट फ्लेम या रंगांचा समावेश आहे. (सर्व फोटो - रॉयल एनफिल्ड)
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईक