शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रतिक्षा संपली! लाँच पूर्वीच Royal Enfield Hunter 350 चे फोटो आले समोर, पाहा लूक आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 3:32 PM

1 / 6
रॉयल एनफील्ड आपली नवी मोटरसायकल रॉयल एनफील्ड हंटर 350 (Royal Enfield Hunter 350) 7 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. अधिकृत घोषणेपूर्वी, रॉयल एनफिल्ड आणि आयशर मोटर्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी बँकॉक येथून हंटर 350 चा व्हिडिओ शेअर केला आहे.
2 / 6
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रॉयल एनफील्ड हंटर 350 बाबातच्या अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. नवीन रॉयल एनफील्ड हंटर ही ड्युअल टोन कलरमध्ये उपलब्ध असेल. हंटर 350 एक ऑफसेट सर्क्युलर इन्स्ट्रूमेंट क्लस्टर सपोर्ट करतं आणि त्याच्या उजव्या बाजूला एक छोटा नेव्हिगेशन पॉडही देण्यात आलाय. व्हिडीओमध्ये हंटर 350 च्या टँकवर पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या शेड्सही दिसत आहेत.
3 / 6
ही मोटरसायकल अधिकृतरित्या 7 ऑगस्टला लाँच केली जाईल. तसंच ही रॉयल एनफिल्डची सर्वात स्वस्त मोटरसायकल असल्याचं म्हटलं जात आहे. मी हे तुम्हाला दाखवेन अशी अपेक्षा माझ्याकडून केली जात नाही. परंतु मी बॉस आहे, असं पोस्ट शेअर करताना सिद्धार्थ लाल म्हणाले. काही रिपोर्ट्सनुसार हंटर 350ही रेट्रो. मेट्रो आणि मेट्रो रेबेल या तीन ट्रीम्समध्ये लाँच केली जाणार आहे.
4 / 6
Royal Enfield Hunter 350 चं बेस व्हेरिअंट ट्युब टाईप टायर्ससह स्पोक व्हिल्स, सिंगल चेन एबीएस, रिअर ड्रम ब्रेक आणि हॅलोजन टर्न इंडिकेटर्स लाईटसह उपलब्ध होईल. जर हायर व्हेरिअंटमध्ये एलईडी टर्न इंडिकेटर, अलॉय व्हिल्स आणि ड्युअल चॅनल एबीएस मिळणार आहे. सिद्धार्थ लाल यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा एका टॉप व्हेरिअंटचा असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एलईडी टर्न इंडिकेटर्सना अधिकृत एक्सेसरीज म्हणूनही लाँच केले जाऊ शकते.
5 / 6
नवीन हंटर 350 ला ऑफसेट इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह उजवीकडे लहान ट्रिपर नेव्हिगेशन पॉड मिळतो, जो फक्त अतिरिक्त पर्याय म्हणून ऑफर केला जाईल. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सेमी-डिजिटल आहे आणि त्यात गियर पोझिशन इंडिकेटर, तसंच सर्व्हिस रिमाइंडर यांसारखी माहिती समाविष्ट आहे. याला स्विचगियरच्या खाली एक यूएसबी चार्जिंग सॉकेट देखील मिळते.
6 / 6
Hunter 350 मध्ये Meteor 350, नवीन Classic 350 आणि आगामी न्यू जनरेशन Bullet 350 सारखेच इंजिन दिले जाईल. हे 349cc SOHC टू-व्हॉल्व्ह एअर-ऑइल-कूल्ड J-सिरीज इंजिन असेल. ते 6,100 rpm वर 20.2 hp आणि 4,000 rpm वर 27 Nm टॉर्क जनरेट करेल. शिवाय हे इंजिन फाईव्ह-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. सर्व Royal Enfields प्रमाणे, Hunter मध्ये Meteor आणि Classic प्रमाणेच लाँग-स्ट्रोक आर्किटेक्चर इंजिन आहे. इंजिन आणि एस्झॉस्ट काळ्या रंगात देण्यात आला आहे. दरम्यान, रॉयल एनफील्डची ही सर्वात स्वस्त मोटरसायकल ठरण्याची शक्यता असून ही 1.7 लाख एक्स शोरूम किंमतीत उपलब्ध होऊ शकते.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्ड