royal enfield meteor 350 at down payment of 23 thousands here its features and emi details 2022
केवळ २३ हजारांत घरी न्या Royal Enfield Meteor 350, पाहा फीचर्स आणि किती असेल EMI By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 4:31 PM1 / 7भारतातील क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डचे (Royal Enfield) वर्चस्व आहे. कंपनीची प्रीमियम क्रूझर बाइक Royal Enfield Meteor 350 ही या सेगमेंटमधील लोकप्रिय बाइक्सपैकी एक आहे. या बाईकमध्ये कंपनीने जबरदस्त लूकसह जबरदस्त इंजिन दिले आहे.2 / 7या बाईकने लांबचा प्रवास अगदी सहज करता येतो. कंपनीने या बाईकचे स्टेलर व्हेरियंट भारतीय बाजारात ₹ 2,07,333 च्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च केले आहे. 3 / 7त्या स्कूटरची ऑन रोड किंमत ₹ 2,34,444 पर्यंत आहे. जर तुम्हाला ही बाईक आवडत असेल आणि ती कमी बजेटमध्ये खरेदी करायची असेल, तर तुम्ही कंपनीने दिलेल्या फायनान्स प्लॅनचा फायदा घेऊन ही बाईक खरेदी करू शकता.4 / 7Royal Enfield Meteor 350 Stellar व्हेरियंटवर उपलब्ध असलेल्या फायनान्स प्लॅनबद्दल सांगायचं झालंतर कंपनी ही बाईक खरेदी करण्यासाठी बँकेकडून ₹ 2,11,444 पर्यंत कर्ज उपलब्ध होते. तर उर्वरित 23 हजारांची रक्कम तुम्हाला डाऊन पेमेंटच्या रुपात द्यावी लागणार आहे.5 / 7तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी तब्बल 36 महिन्यांचा कालावधीही मिळेल. या कालावधीत जवळपास 9.7 टक्क्यांच्या वार्षिक व्याजदराप्रमाणे तुम्हाला 6433 रुपयांचा महिन्याला ईएमआय द्यावा लागेल. दरम्यान, बँका किंवा फायनॅन्स कंपन्यांप्रमाणे तुम्हाला व्याजदर हा निराळा लागू शकतो.6 / 7रॉयल एनफील्ड मेटेओर 350 स्टेलर व्हेरिअंटमध्ये तुम्हाला 350 सीसीचं एअर कुल्ड सिंगल सिलिंडर असलेलं 349 सीसीचं इंजिन देण्यात येतं. हे इंजिन 20.4 पीएसची पॉवर आणि 27 एमएमचं पीक टॉर्क जनरेट करते.7 / 7कंपनी या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स ऑफर करते. तसंच ही बाईक 41.88 किमी प्रति लिटरचं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या बाईकमध्ये पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. याशिवाय यात ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमही देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications