royal enfield scram 411 launch date in india to be on 7 march 2022 know about all details
Royal Enfield घेण्याचा विचार करताय? थांबा! ७ मार्चला येतेय नवीन बाइक येतेय; पाहा, डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 5:36 PM1 / 9Royal Enfield च्या आवाज करत जाणाऱ्या बाइक्सचे तरुणाईच्या मनावर आजही तेवढेच गारुड आहे. कंपनीनेही काळाशी सुसंगत असलेली उत्पादने बाजारात सादर करत आहेत. कंपनीने आपली रेंजही मोठ्या प्रमाणात वाढवल्याचे पाहायला मिळत आहे. 2 / 9तुम्हीही Royal Enfield ची बाइक घेण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा. कारण, कंपनी मार्च महिन्यात आपली नवीन बाइक लाँच करणार असून, डिलरशीपकडे नवीन बाइक पोहोचण्यास सुरुवातही झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 3 / 9Royal Enfield Scram 411 कंपनीची नवीन बाइक असणार आहे. याच्या लाँचिंग तारखेचा खुलासा करण्यात आला आहे. या बाइकला भारतीय बाजारात ७ मार्च २०२२ रोजी आणले जाणार आहे. कंपनीने याचा नवीन टीझर जारी केला आहे. 4 / 9Royal Enfield Scram 411 ही बाइक कंपनीची हिमालयनशी प्रेरित आहे. या बाइकला डीलरशीपकडे पाहिले गेले आहे. लाँचिंगसोबत याची डिलिव्हरी सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 5 / 9Royal Enfield Scram 411 ची डिजाइन पाहिल्यास Royal Enfield Scram 411 चे मूळ सिल्हूट Himalayan सारखी आहे. यात रेट्रो थीमचा वापर करण्यात आला आहे. ज्यात गोल हेडलँम्प आणि रियर व्ह्यू मिररचा समावेश आहे. 6 / 9Royal Enfield Scram 411 मध्ये फोर्क गॅटर, फ्यूल टँकची डिझाइन, वाइड हँडलबार, चेसिस, स्ल्पिट सीट्स आणि अपस्वेट एग्जॉस्ट Himalayan सारखी आहे. Royal Enfield Scram 411 च्या पुढे आणि मागे डेडिकेटेड रँक नाही. 7 / 9Royal Enfield Scram 411 याच्या फ्रंट मध्ये कॉम्पॅक्ट साइजच्या टँक आणि रियर मध्ये सिंगल पीस ग्रॅब रेल आहे. यात छोट १९ इंचाचे फ्रंट व्हीलचा उपयोग केला जाणार आहे. बाइक ऑफ रोडिंगसाठी सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. 8 / 9Royal Enfield Scram 411 विंडस्क्रीन सोबत येत नाही. यात दुप्पट उद्देशच्या टायरसोबत वायर स्पोकच्या चाकाचा वापर केला आहे. तर याचे फ्रंट फेंडर आहे Himalayanच्या तुलनेत याचे टर्न इंडिकेटर्सचा आकार सुद्धा वेगळा असण्याची शक्यता आहे. 9 / 9Royal Enfield Scram 411 बाइकच्या ओव्हरऑल स्टाइलमध्ये काही अन्य बदल होऊ शकतात. Royal Enfield Scram 411 साठी काही नवीन कलर ऑप्शन आणले जावू शकते. Royal Enfield Scram 411 ला ट्रिपर नेविगेशन सिस्टम शिवाय, एक अपडेटेड इंस्ट्रूमेंट कंसोल मिळू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications