Royal Enfield Shotgun 650 to Xpulse 200T; These bikes will be launched in November
रॉयल इनफील्ड शॉटगन 650 ते Xpulse 200T; नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार 'या' जबरदस्त बाइक्स By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 2:51 PM1 / 6 तुम्ही नवीन बाइक खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला काही जबरदस्त बाइक्सबद्दल सांगणार आहोत, ज्या नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणार आहेत. या लिस्टमध्ये रॉयल एनफील्डची Super Meteor 650 आणि Shotgun 650cc सामील आहे. याशिवाय काही इलेक्ट्रीक बाइक्सदेखील आहेत. 2 / 6रॉयल एनफील्ड सुपर Meteor 650 आणि शॉटगन 650- रॉयल एनफील्ड (Royal Enfield) या महिन्यात सर्वात मोठी लॉन्चिंग करू शकते. ग्राहक रॉयल एनफील्डच्या या 650cc गाड्यांच्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. तर आता ग्राहकांची प्रतिक्षा संपली आहे. कंपनीची सुपर मेटोर 650 आणि शॉटगन 650 टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आली आहे. परंतू, कंपनीने याच्या अधिकृत लॉन्चिंगबाबत घोषणा केलेली नाही.3 / 6Updated Hero Xpulse 200T- भारतातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी हीरोदेखील या महिन्यात आपली नवीन बाइक मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी नवीन अपडेटेड Xpulse 200T ला मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने याचे टीजरदेखील जारी केले आहे. हीरोने ऑगस्टमध्येच या गाडीचा फोटो समोर आणला होता. 4 / 6Gogoro Electric Scooters-हीरोने नुकतीच आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लॉन्च केली आहे. आता हीरो तायवानची इ-स्कूटर निर्माता कंपनी Gogoro सोबत मिळून अनेक नवीन स्कूटरवर काम करत आहे. कंपनी 3 नोव्हेंबरला भारतीय बाजारात रोडमॅप तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. या महिन्यात कंपनी आपले प्रोडक्ट लॉन्च करू शकते.5 / 6Ultraviolette F77-या महिन्यात इलेक्ट्रिक स्पेसमध्ये Ultraviolette आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल F77 लॉन्च करू शकते. याची लॉन्चिंग आधी होणार होती, पण COVID-19 मुळे लॉन्चिंग पुढे ढकलली. कंपनी या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 10.5kWh ची बॅटरी पॅक ऑफर करत आहे. याची रेंज 307km असेल. 24 नोव्हेंबरला ही बाइक लॉन्च होईल.6 / 6QJMotor-या लिस्टमध्ये अखेर नाव QJMotorचे आहे. भारतीय बाजारात हा एकदम नवीन ब्रँड आहे. हा बेनेलीचा सहयोगी ब्रँड आहे. या दोन्ही कंपन्या चीनी कियानजियांग ग्रुपच्या मालकीच्या आहेत. भारतासाठी QJMotor च्या पहिल्या लाइनअपमध्ये 4 नवीन मोटरसायक्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications