शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Royal Enfield लाँच करणार पाच नवीन क्रूझर, अ‍ॅडव्हेंचर आणि रेट्रो बाईक्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 3:06 PM

1 / 7
नवी दिल्ली : क्रूझर आणि अ‍ॅडव्हेंचर बाईकचा उल्लेख केल्यावर ज्या कंपनीचे नाव प्रथम येते ती म्हणजे रॉयल एनफिल्ड. क्रूझर आणि अॅडव्हेंचर विभागांमध्ये रॉयल एनफील्डची मजबूत पकड आहे. मार्केटमधील आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी कंपनी सहा नवीन बाईक्स लाँच करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
2 / 7
या सहा बाईक्सपैकी कंपनीने रॉयल एनफील्ड हंटर 350 ही पहिली बाईक मार्केटमध्ये आणली आहे. रॉयल एनफील्ड हंटर लाँच केल्यानंतर कंपनी तीन इंजिन सेगमेंट 350 सीसी, 450 सीसी आणि 650 सीसीमध्ये आपल्या पाच बाईक्स टप्प्याटप्प्याने लाँच करणार आहे. ज्यामध्ये आज आम्ही त्या पाच बाईक्सची माहिती देत ​​आहोत, ज्या लवकरच भारतातील मार्केटमध्ये दाखल होऊ शकतात.
3 / 7
रॉयल एनफिल्ड आपली सर्वाधिक विक्री होणारी बाईक क्लासिक 350 ची सफलता पाहिल्यानंतर, याचे हेवी इंजिन व्हर्जन लाँच करणार आहे. जे 650 सीसी सेगमेंटमध्ये असेल. या बाईकचे डिझाईन आणि फीचर्स 350 सीसीप्रमाणे असतील. शिवाय, इंजिन 650 सीसी दिले जाईल. कंपनी ही बाईक जानेवारी 2023 मध्ये 3.10 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच करू शकते.
4 / 7
रॉयल एनफिल्डने नुकतेच Scrum 410 मार्केटमध्ये आणले आहे, त्यानंतर कंपनी आपले 450 cc व्हेरिएंट लाँच करण्यावर काम करत आहे. या बाईकचे डिझाईन देखील सध्याच्या Scrum 410 सारखेच असेल परंतु तिचे फीचर्स आणि बॉडी ग्राफिक्स अपडेट केले जाऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार, कंपनी फेब्रुवारी 2023 मध्ये ही बाईक 2.80 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच करू शकते.
5 / 7
रॉयल एनफिल्ड हिमालयन ही आपल्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी अॅडव्हेंचर बाईक आहे, जी तिच्या ताकदीमुळे पसंत केली जाते. कंपनीची ही बाईक 411 सीसी इंजिनसह बाजारात आहे. आता कंपनी या बाईकच्या 450 सीसी इंजिन व्हर्जनवर काम करत आहे आणि ही बाईक डिसेंबर 2022 मध्ये 3 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह सादर केली जाऊ शकते.
6 / 7
रॉयल एनफिल्डने भारतीय बाजारात Meteor 350 लाँच केली आहे. या बाईकच्या डिझाइनमुळे खूप यश मिळत आहे. या बाईकमध्ये हेवी इंजिनची मागणी वाढल्यानंतर कंपनी 650 सीसी इंजिनसह बाजारात आणणार आहे, ज्याचे डिझाइन सध्याच्या बाईकप्रमाणेच राहणार आहे. ही बाईक दिवाळीच्या सणासुदीच्या हंगामात 3.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केली जाऊ शकते.
7 / 7
रॉयल एनफिल्ड Shotgun 650 लाँच झाल्याची बातमी बर्‍याच दिवसांपासून गाजत आहे, त्यामुळे ही बाईक टेस्टिंग दरम्यान अनेकदा स्पॉट झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, ही एक रेट्रो डिझाइन बाईक असणार आहे, जी कंपनी दिवाळीला बाजारात लाँच करू शकते. या बाईकची सुरुवातीची किंमत 3.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईक