शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील सर्वात स्वस्त कारवर मिळतेय ४० हजारांपर्यंतची सूट; ३० किमीपेक्षा अधिक मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 9:50 AM

1 / 10
मारुती सुझुकीची अल्टो (Maruti Suzuki Alto) ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे. दरम्यान, कंपनीनं ग्राहकांना ही कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी दिली आहे.
2 / 10
मारुती सुझुकी ही कंपनी ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकी अल्टोसह विविध वाहनांवर मोठी सूट देत आहे. या कारवर ग्राहक 40,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. तर जाणून घेऊया कोणती आहे ही ऑफर आणि तुम्हाला ती कशी मिळवता येईल.
3 / 10
मारूती सुझुकी ऑल्टोची किंमत 2.99 लाख रूपयांपासून सुरू होऊन 4.70 लाख रूपये (एक्स शोरूम) इतकी आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही ऑप्शनमध्ये मिळते.
4 / 10
कंपनी ऑगस्ट महिन्यात या कारच्या पेट्रोल व्हेरिअंटवर 25 हजार रूपयांचा कॅश डिस्काऊंट ऑफर करत आहे. तर सीएनजी व्हेरिअंटवर केवळ 5 हजार रूपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे.
5 / 10
याशिवाय ग्राहकांना १५ हजार रूपयांपर्यंत एक्सचेंज बोनसही देण्यात येणार आहे. या प्रकारे ग्राहक मारुती अल्टोच्या पेट्रोल व्हेरिअंटवर 40 हजार रूपयांपर्यंतची बचत करू शकतात.
6 / 10
कंपनीनं यामध्ये 796cc चं पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 48 PS ची पॉवर आणि 69Nm चा टॉर्क जेनरेट करतं. पेट्रोल व्हेरिअंट 22 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देते.
7 / 10
ही कार फॅक्ट्री फिटे़ड सीएनजी व्हेरिअंटमध्येही येते. त्यामध्ये इंजिन 41PS ची पॉवर आणि 60Nm चा पीक जनरेट करते. सीएनजीसह ही कार 31 किमीपर्यंतचं मायलेज देते.
8 / 10
मारुती अल्टोच्या टॉप VXi+ व्हेरिअंटमध्ये Android Auto आणि Apple CarPlay सोबत 7 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आला आहे. यामध्ये की-लेस एन्ट्री आणि फ्रन्ट पॉवर विंडो देण्यात आल्या आहेत.
9 / 10
सेफ्टीसाठी कारमध्ये ड्रायव्हर साईड एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर आणि ईबीडीसोबत एबीएससारखे फीचर्सही देण्यात येत आहेत.
10 / 10
ग्राहकांची या कारला उत्तम पसंतीही मिळत आहे. या कारची टक्कर Renault Kwid आणि Datsun redo-Go सारख्या गाड्यांशी आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारIndiaभारतDatsunडॅटसनRenaultरेनॉल्ट