Safety Tricks For Cars Take care of your car in summer Follow these simple tips
Safety Tricks For Cars : उन्हाळ्यात 'अशी' घ्या आपल्या कारची काळजी; फॉलो करा 'या' टिप्स By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 9:45 AM1 / 13आपली स्वत:ची कार असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. कार असली तरी तिची काळजी घेणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. 2 / 13उन्हाळ्याच्या कालावधीत गाडीच्या टायर्समधलं प्रेशर आपल्या आपण वाढतं. यामुळे गाडी चालवताना ते फुटण्याचीही भीती असते.3 / 13याशिवाय गादी अधिक गरम झाल्यानं ती बंद होण्याचीही भीती असते. त्यामुळे गाडी खरेदी करताना तिच्या कलरची निवड करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. 4 / 13गरमीमध्ये गाड्यांच्या रंगावरही परिणाम होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया उन्हाळ्याच्या कालावधीत गाडीची काळजी नक्की कशी घेता येईल.5 / 13जेव्हा आपण कुठेही प्रवास करत नसता, तेव्हा आपली कार गॅरेजमध्ये ठेवण्याचा एक पर्याय उपलब्ध असतो. परंतु प्रवासादरम्यान आपल्याला बाहेर कोठे तरी पार्क करावी लागते.6 / 13अशा वेळी उन्हात गाडी उभी केल्यास गाडीच्या रंगावर परिणाम होण्याची भीती असते. याशिवाय गाडी अधिक गरमही होऊ लागते.7 / 13अशा परिस्थितीत तुमची गाडी सावली असलेल्या ठिकाणी पार्क करा. याशिवाय अधिक कालावधीसाठी तुम्ही कार पार्क करणार असाल तर गाडीसाठी मिळणारी छत्रीही तुम्ही घेऊ शकता.8 / 13उन्हाळ्यात तुमच्या कारच्या रंगावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे कारला अल्ट्राव्हॉयलेट युव्ही प्रोटेक्शन असलेलं पॉलिश करून घ्या.9 / 13यामुळे कारच्या रंगावर कोणताही परिणाम होणार नाही. तसंच पक्षांद्वारे किंवा अन्य कोणत्या गोष्टीमुळे जर गाडी खराब झाली तर कारच्या रंगावर त्याचा परिणाम होणार नाही. 10 / 13गाड्यांच्या काचेवर सनशेडचा वापर करून गाडी गरम होण्यापासून वाचवू शकता. काचेवर सनशेडचा वापर केल्यानं गाडीच्य़ा आतल्या बाजूला असलेल्या प्लॅस्टिकची सुरक्षा केली जाऊ शकते.11 / 13गरमीममध्ये कारच्या टायरचं प्रेशर वाढतं. त्यामुळे ते फुटण्याचीही शक्यता असते. यासाठीही काळजी घेणं आवश्यत आहे.12 / 13दर आठवड्याला टायरचं प्रेशर तपासून पाहू शकता. तसंच आवश्यकता असल्यास टायरमध्ये साध्या हवे ऐवजी नायट्रोजनही भरू शकता.13 / 13गरमीमध्ये गाडीच्या कुलेंटची काळजी घेणं अधिक आवश्यक आहे. कारण गाडीचं इंजिन थंड ठेवण्यात ते मोठी मदत करतं. आणखी वाचा Subscribe to Notifications