शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Electric Vehicle Sales: इलेक्ट्रीक वाहनांची क्रेझ वाढली; गेल्या आर्थिक वर्षात विक्रीत ३ पट वाढ, टाटा मोटर्सचा जलवा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 11:39 PM

1 / 8
Electric Vehicle Sales: गेल्या आर्थिक वर्षात (२०२१-२२) मध्ये देशात इलेक्ट्रीक वाहनांच्या किरकोळ विक्रीत तीन पटींनी वाढ झाली आहे. यानंतर ही संख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price Hike) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे लोक अन्य पर्यायांकडेही वळताना दिसत आहे. फेडरेशन ऑफ डीलर्स असोसिएशन म्हणजेच फाडा (FADA) नं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.
2 / 8
फाडाच्या ताज्या आकडेवारीनुसार २०२१-२२ मध्ये देशात इलेक्ट्रीक वाहनांच्या किरकोळ विक्रीत तीन पटींची वाढ होऊन ती चार लाख युनिट्सच्या पुढे गेली आहे. एकूण विक्रीमध्ये दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
3 / 8
फाडानं दिलेल्या आकडेवारीनुसार २०२१-२२ मध्ये एकूण ४ लाख २९ हजार २१७ वाहनांची विक्री झाली. यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांची संख्या १ लाख ३४ हजार ८२१ युनिट इतकी होती.
4 / 8
२०१९-२० या दरम्यान देशात १ लाख ६८ हजार ३०० वाहनांची विक्री झाली. यामध्ये इलेक्ट्रीक प्रवास वाहनांची किरकोळ विक्री तीन पटींनी वाढून १७ हजार ८०२ युनिट झाली. २०२०-२१ मध्ये ती केवळ ४ हजार ९८४ युनिट होती.
5 / 8
या सेगमेंटमध्ये एकूण १५ हजार १९८ इलेक्ट्रीक वाहनांची विक्री करून टाटा मोटर्स (TATA Motors) आघाडीवर होती. म्हणजेच २०२१-२२ मध्ये कंपनीकडून जास्तीत जास्त इलेक्ट्रीक वाहनांची विक्री करण्यात आली. कंपनीचा बाजारातील हिस्सा ८५.३७ टक्के होता.
6 / 8
तर दुसरीकडे एमजी मोटर्स २ हजार ०४५ इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीसोबत दुसऱ्या स्थानी राहीली. त्यांचा बाजारातील हिस्सा ११.४९ टक्के आहे. २०२०-२१ मध्ये एमजी मोटर्सनं १११५ गाड्यांची विक्री केली होती.
7 / 8
गेल्या आर्थिक वर्षात इलेक्ट्रीक दुचाकींची विक्री पाच पटीने वाढून २३१३३८ इतकी झाली आहे. २०२०-२१ मध्ये हा आकडा ४१०४६ युनिट होता. हिरो इलेक्ट्रीक ६५३०३ युनिट्सच्या विक्रीसह दुचाकी विभागात अव्वल स्थानावर आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा २८.२३ टक्के होता.
8 / 8
ओकिनावा ऑटोटेक ४६४४७ युनिट्ससह दुसऱ्या स्थानावर राहीली. तर २४६४८ युनिट्सच्या विक्रीसह एम्पियर व्हेईकल्स तिसऱ्या स्थानावर राहीली. हीरो मोटोकॉर्प समर्थित एथर एनर्जीनं देल्या आर्थिक वर्षात १९९७१ इलेक्ट्रीक वाहनांची विक्री केली. ही कंपनी चौथ्या तर चर्चेत असलेली ओला इलेक्ट्रीक सहाव्या स्थानी राहीली.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार