शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भन्नाट! तुमची Hero Splendor Electric करता येणार; किंमत पाहून म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 3:23 PM

1 / 9
भारतात पेट्रोल, डिझेलच्या किंमती खूपच वाढल्या आहेत. सध्या इलेक्ट्रीक वाहनांना मागणी वाढत असून कंपन्यांच्या नव्या ईव्ही सोबतच काही अन्य कंपन्या तुमच्याकडील जुन्या पेट्रोलवरील गाड्या इलेक्ट्रीक करण्याच्या कामी लागल्या आहेत. (first RTO approved electric conversion kit for motorcycles Hero Splendor launched By GoGoA1.)
2 / 9
गेल्या महिन्यात जुन्या डिझायरचे ईलेक्ट्रीक किट बाजारात आणण्यात आले होते. आता सर्वाधिक खपाच्या हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) ला ईलेक्ट्रीक मध्ये कन्ह्वर्ट करण्यासाठीचे किट विकसित करण्यात आले आहे.
3 / 9
महत्वाचे म्हणजे Hero Splendor EV conversion kit ला आरटीओची परवानगी देखील मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांकडे असलेल्या या सर्वाधिक खपाच्या बाईकला आता इलेक्ट्रीक करण्याची संधी आली आहे.
4 / 9
EV conversion kit हे तुमच्याकडे असलेल्या जुन्या किंवा नवीन घेत असाल तर त्या बाईकमध्ये देखील वापरता येणार आहे. तसेच पेट्रोलवरील पैसेदेखील वाचणार आहेत.
5 / 9
देशात सध्या नव नवीन कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटर येत आहेत. प्रतिष्ठित कंपन्यांच्या स्कूटर, बाईक नाही म्हणायला नावालाच आहेत. नव्या कंपन्यांवर विश्वास नसल्याने ग्राहक तिकडे वळत नाहीय.
6 / 9
मोठ्या कंपन्या जसे की, यामहा, होंडा, हिरो, टीव्हीएस यांच्या ईव्ही भविष्यात लाँच होणार आहेत. अशावेळी पेट्रोल आणि महागाईत पिचलेल्या लोकांसाठी GoGoA1 या स्टार्टअप कंपनीने स्प्लेंडर ईलेक्ट्रीक किट आणून नवा पर्याय ठेवला आहे. ही स्कूटर 151 किमीची रेंज देते.
7 / 9
Hero Splendor EV conversion kit Price ही 35000 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच जीएसटी 6300 रुपये आकारला जाणार आहे. म्हणजेच हे किट 41300 रुपयांना पडणार आहे.
8 / 9
या किटची वॉरंटी 3 वर्षांची आहे. यामध्ये बॅटरी पॅकही येते. जर तुम्हाला 151 किमीची रेंज हवी असल्यास बॅटरी पॅकसह या किटची किंमत 95,000 रुपयांवर जाते. इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाईटवर खरेदी करू शकतात.
9 / 9
सध्या कंपनीने 36 आरटीओ क्षेत्रात इनस्टॉलेशन सुविधा सुरु केली आहे. लवकरच याचा विस्तार केला जाणार आहे.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनhero moto corporationहिरो मोटो कॉर्प