See Tata's new Harrier... stylish, tough and bigger...!
टाटाची नवी Harrier पाहा...स्टायलिश, दणकट आणि मोठीही...! By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 7:20 PM1 / 9टाटा मोटर्स नेक्सॉनच्या यशानंतर लेटेस्ट एसयुव्ही Harrier ही बहुचर्चित कार लवकरच लाँच करणार आहे. मिडिया ड्राईव्हसाठी टाटाने नुकतेच जोधपूरमध्ये Harrier कार लाँचिंग ठेवले होते. ही एसयुव्ही जानेवरीमध्ये लाँच होणार आहे.2 / 9टाटाच्या या ताकदवान एसयुव्हीची किंमत 16 ते 21 लाख रुपये असणार आहे. या एसयुव्हीची बुकिंगही सुरु करण्यात आली असून 30 हजार रुपयांमध्ये ही कार बुक करता येते. 3 / 9मिडियासाठी ठेवलेल्या ड्राईव्हमध्ये या कारची व्हेरिअंटस्, फिचर्स, किंमत आणि रंग याबाबतचा खुलासा झाला आहे.4 / 9या कारला गेल्यावर्षीच्या दिल्ली ऑटोएक्स्पोमध्ये लाँच केले गेले होते. यावेळी या कारचे नाव H5X ठेवण्यात आले होते. 5 / 9टाटा हॅरिअरचे इंजिन 2.0 लीटरचे आहे. या कारला 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4×2 व्हील ड्राइव ऑप्शन देण्यात आला आहे. 6 / 9सध्या 5 सीटर व्हेरिअंट लाँच होणार असून वर्षाच्या शेवटी 7 सीटर व्हेरिअंट लाँच केले जाईल. 7 / 9Harrier ला प्रथम चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. 8 / 9XE, XM, XT आणि XZ असे हे व्हेरिअंट असणार आहेत. 9 / 9लांबी, रुंदीला Harrier ह्युंदाईच्या क्रेटा आणि फियाटच्या कंपासपेक्षा जास्त असून यामुळे जास्त लेग आणि शोल्डररूम मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications