शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bajaj Freedom 125 CNG Bike: शॉकिंग मायलेज! बजाजच्या जगातील पहिल्या CNG Bike ची किंमत जाहीर; पहा फिचर्स, फर्स्ट लूक...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 2:22 PM

1 / 8
बजाजच्या जगातील पहिल्या सीएनजी बाईकचे आज लाँचिंग करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सीईओ राजीव बजाज उपस्थित होते. यावेळी बजाज फ्रिडम सीएनजी बाईकची किंमत, मायलेज आणि फिचर्सही प्रसिद्ध करण्यात आली.
2 / 8
राजीव बजाज म्हणाले की, जगातील पहिली सीएनजी रिक्षा आम्हीच आणली होती. परंतू, तेव्हा देशात दिल्लीत एकच सीएनजी पंप होता. यामुळे लोकांनी ही रिक्षा फारशी स्विकारली नाही. परंतू आम्ही यातून शिकलो आणि आता सीएनजी बाईक आणली आहे. याचे नाव फ्रिडम ठेवण्यात आले आहे. कारण आपल्याला विदेशातून तेल आणण्यावरील खर्च वाचविता येणार आहे. रेंजची भिती संपेल, चार्जिंगचा त्रास होणार नाही. प्रदुषणापासून मुक्ती मिळेल, असे बजाज म्हणाले.
3 / 8
बजाजच्या फ्रिडम १२५ सीएनजी बाईकवर तुम्हाला जगातील सर्वात मोठी सीट मिळणार आहे. यामुळे मुलांना टाकीवर बसविण्याची गरज राहणार नाही, असेही राजीव बजाज म्हणाले. यावेळी बजाज यांनी ईलेक्ट्रीक गाड्यांवरही तोंडसुख घेतले. बजाजची चेतक ईव्ही असूनही राजीव बजाज यांनी ईलेक्ट्रीक गाड्यांवरील सबसिडीबाबतच्या अनिश्चिततेपासूनही स्वातंत्र्य मिळेल, असेही बजाज म्हणाले.
4 / 8
गडकरी म्हणाले की, मी जेव्हा मंत्रिपदाची जबाबदारी घेतली तेव्हा भारताची ऑटो इंडस्ट्री जगात सातव्या क्रमांकावर होती. आता ती जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. भारताला पाच ट्रिलिअन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याचे माझे स्वप्न आहे, यात ऑटो इंडस्ट्री देखील महत्वाची आहे, असे गडकरी म्हणाले.
5 / 8
बजाज फ्रिडममध्ये दोन लीटरची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे. सीएनजी संपल्यानंतर रिझर्व्ह म्हणून हे पेट्रोल वापरता येणार आहे. सामान्य बाईकमध्ये १० ते १२ लीटरची पेट्रोलची टाकी असते.
6 / 8
बजाजची सीएनजी बाईक एका किलोला तब्बल २१३ किमीचे मायलेज देणार आहे. या बाईकला दोन लीटर सीएनजी बसेल एवढा सिलिंडर असणार आहे. सीटखाली सीएनजी सिलिंडर ठेवण्यात आला आहे.
7 / 8
तसेच यामध्ये एलईडी हेडलँप, स्पोर्टी स्टायलिंग, मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. दोन लीटर पेट्रोल आणि २ लीटर सीएनजीच्या टाकीवर ही बाईक तब्बल ३३० किमी चालणार आहे.
8 / 8
बजाज सीएनजी फ्रिडम बाईकची सुरुवातीची किंमत ९५००० रुपये एक्स शोरुमपासून सुरु होत आहे. ड्रम एलईडी व्हेरिअंट १.०५ लाख रुपये तर डिस्क व्हेरिअंट १.१० लाख रुपयांना जाणार आहे. तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या या बाईकची डिलिव्हरी सुरु करण्यात आली आहे.
टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलPetrolपेट्रोलNitin Gadkariनितीन गडकरी