Shocking! Ola Electric Scooter Price is too much, What is exact cost to make EV Scooter, see
Ola Scooter च्या वाढीव किंमतीची पोलखोल?; जाणून घ्या बनवण्यासाठी किती येतो खर्च... By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 1:10 PM1 / 12गेल्या महिन्याभरापासून ओला ईलेक्ट्रीक स्कूटरने (Ola Electric Scooter) सोशल मीडियावर खूप कल्ला केला होता. मात्र, गल्ला जमविण्याच्या ओलाच्या मनसुब्यांमुळे लोकांची निराशा झाली आहे. यामुळे ओलाचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. अनेकांनी किंमतीवरून ओलाची बुकिंग रद्द (Ola Electric Scooter booking cancle) करण्याचा विचार सुरु केला आहे. (What s the cost of making one good electric scooter.)2 / 12ओलाच्या एस १ व्हेरिअंटची किंमत 1 लाख रुपयांना फक्त एक रुपया कमी आहे. तर एस १ प्रोची किंमत ही 1.30 लाख रुपयांचा एक रुपया कमी आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर या 65-70 हजार रुपयांपासून मिळतात. परंतू या ईलेक्ट्रीक स्कूटर बनविण्याचा खर्च किती येतो? माहिती आहे का? चला एका मॅन्युफॅक्चररने सांगितले आहे, जाणून घेऊया. 3 / 12एका इलेक्ट्रीक स्कूटरची मोटर, बॅटरी, रेंज आणि दुसऱ्या सुट्या भागांमुळे ही स्कूटर कितीला बनते याबाबत अल्टीअस ऑटो सोल्यूशन (Altius Auto solutions) चे संस्थापक राजीव अरोरा यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या कंपनीने देखील ईव्ही ऑटो एक्स्पोमध्ये दोन मॉडेल सादर केले आहेत. 4 / 12राजीव यांनी सांगितले की, एक ई-स्कूटर बनविण्यासाठी जवळपास 30 ते 45 हजार रुपयांचा खर्च येतो. हे पंधरा हजाराचे अंतर हे वेगवेगळ्या मोटरमुळे येते. स्कूटरता सर्वात मोठा खर्च हा मोटरचा असतो. सध्या दोन प्रकारच्या मोटर वापरल्या जातात. क्वालिटीनुसार स्कूटरची किंमत कमी जास्त असते.5 / 12हब मोटर आणि मिड ड्राईव्ह मोटर हे ते प्रकार आहेत. हब मोटर गाडीच्या चाकाच्या शाफ्टा जोडलेली असते. तिची किंमत 20 हजार रुपये असते. तर मिड ड्राईव्ह मोटर ही गाडीच्या सेंटरला लावलेली असते. ती चेन किंवा बेल्टद्वारे काम करते. ही थोडी महाग असते. 6 / 12लिथिअम आयनची बॅटरी ही 13 ते 15 हजार रुपये प्रति किलोवॉट असते. सरकार प्रति किलोवॉट 15000 रुपयांपर्यंत सबसिडी देते. यामुळे हा पैसा अन्य स्पेअर पार्टवर वळता होतो. 120 किमी रेंजच्या स्कूटरला 40000 रुपयांची बॅटरी लागते. परंतू सरकार त्याचे पैसे देते. 7 / 12चांगले स्टील वापरले तर 5000 रुपयांचा खर्च होतो. प्लास्टिकचा खर्च 7000. हार्मेस, लाईट, कन्व्हर्टर सारख्या गोष्टी 2 ते 3 हजार रुपयांत मिळतात. म्हणजेच अन्य पार्ट्सवर 15 हजार रुपयांचा खर्च.8 / 12अल्टीअस ही कंपनी स्कूटर, बाईक, रिक्षा तयार करते. अल्टीअसच्या फॅमिली बाईकची किंमत 48000 रुपये आहे, ती 140 किमी रेंज देते. ई-स्कूटरची किंमत 35000 रुपये आहे जी 100 किमी रेंज देते. मग ओलाची स्कूटर जी 100 किमी रेंज देते तिची किंमत तिप्पटीने महाग आहे. 9 / 12ओलाची ही स्कूटर बनविण्यासाठी 50000 हजार रुपये एस १ आणि 65000 रुपये एस२ साठी खर्च जरी गृहीत धरला तरी ओला ग्राहकांकडून दुप्पट पैसा उकळत आहे. 10 / 12दुसरी महत्वाची बाब म्हणजे, ओला होम डिलिव्हरी करणार आहे. तसेच होम सर्विसही देणार आहे. साऱ्या गोष्टी ऑनलाईन असतील, मग ओलाचा डीलर, शोरुम, सर्विस सेंटर आदींचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. फक्त कर्मचाऱ्यांचा पगार आणि स्कूटर पाठविण्याचा खर्च एवढाच काय तो जादाचा खर्च कंपनीला येणार आहे. 11 / 12स्कूटर पाठविण्यासाठी जरी 2 ते 4 हजार रुपये ट्रान्सपोर्ट खर्च पकडला तरी देखील ओला जो नफा कमविणार आहे, त्यामध्ये अल्टीअसची 48000 हजार रुपयांची बाईक येईल. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. 12 / 12दुसरी महत्वाची बाब म्हणजे, पर्यावरण वाचविण्याचा उद्देश ठीक आहे. परंतू जर पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर जर 65 ते 80 हजारांत मिळत असतील आणि ओला नाही घेतली तर वरचे 20 ते 50000 रुपये पेट्रोलला वापरता येतील. जसे पेट्रोल की डिझेल कार बाबत व्यावहारिक दृष्टीकोण आहे तसाच विचार लोक ईव्ही की पेट्रोल स्कूटर असा करू शकतात. कारण सबसिडीने 5 ते 6 हजारांचाच फरक पडणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications