शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA ला टक्कर देण्यास ‘ही’ कंपनी सज्ज! सिंगल चार्जमध्ये मुंबई-अहमदाबाद प्रवास शक्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 8:38 PM

1 / 9
गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक कारची विक्री वाढताना दिसत आहे. या ईव्ही मार्केटमध्ये टाटा मोटर्सचा दबदबा कायम असला, तरी अनेकविध कंपन्या आपल्या कार आता ईव्ही पर्यायात उपलब्ध करून देत आहेत.
2 / 9
इलेक्ट्रिक कारमध्ये सिंगल चार्जमध्ये वाहन किती लांब जाऊ शकते, याला ग्राहक जास्त महत्त्व देत असल्याचे पाहायला मिळते. यातच टाटा मोटर्सला टक्कर देण्यास परदेशातील नावाजलेली कंपनी सज्ज झाली असून, रेंजच्या बाबतीत ही कंपनी अनेकांना धोबीपछाड देऊ शकणार आहे.
3 / 9
स्कोडा (Skoda) ने आपली ENYAQ COUPE RS iV SUV आणली आहे. या करला कंपनी सेलसाठी यावर्षीच्या अखेरपर्यंत उपलब्ध करणार आहे. स्कोडाच्या या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.
4 / 9
इतकेच नव्हे तर या कारमध्ये ५४५ किमीची मोठी रेंज मिळते. सध्या मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिका कार उपलब्ध आहेत. परंतु, या सर्व कारहून या कारची रेंज जास्त आहे. ही कार सिंगल चार्ज मध्ये ५४५ किमीचे अंतर पार करू शकते. म्हणजेच तुम्ही या कारला एकदा फुल चार्ज केले तर मुंबई ते अहमदाबादपर्यंत प्रवास करू शकाल.
5 / 9
स्कोडाच्या या कारकडून खूप अपेक्षा आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये ही कार Volkswagen ID.5 GTX शी थेट टक्कर देवू शकेल. जर ही कार भारतात लाँच होत असेल तर टाटा नेक्सॉनसह अनेक अन्य मॉडलशी टक्कर होईल.
6 / 9
स्कोडाच्या या कारमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. ही कार स्लॉपिंग रुफलाइन, 'क्रिस्टल फेस' ग्रिल दिले आहे. याशिवाय, कारमध्ये वाइड एअर डॅम, स्लीक मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स सुद्धा दिले आहेत. कारमध्ये याशिवाय, बी पिलर्स, इंडिकेटर माउंटेड ORVMs आणि १८ इंच व्हील्ज दिले आहेत.
7 / 9
या कारमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर दिली आहे जी 82kWh बॅटरी पॅक सोबत येते. ही कार ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टम सोबत येते. हे सेटअप 295hp पावर आणि 460Nm टॉर्क जनरेट करते.
8 / 9
दरम्यान, भारतात इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारचे आधीपासूनच प्रयत्न राहिले आहे. याचे पडसाद आज संसदेत दिसले. मोठ्या शहरात मोकळ्या जागांचा अभाव असल्याने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन ऐवजी बॅटरी स्वॅपिंग धोरण राबवण्यात येणार आहे.
9 / 9
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक वाहनांसंबंधी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. संसदेत अर्थसंकल्प मांडताना त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांविषयी धोरण जाहीर केले आहे.
टॅग्स :Skodaस्कोडाElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर