शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्मार्टफोन कंपनी शाओमी ईव्ही क्षेत्रात उतरली; कार दुसरीच कंपनी बनविणार, हे फक्त विकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 1:01 PM

1 / 7
स्मार्टफोन निर्मितीत आघाडीवर असलेली शाओमी आता ईलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात उतरली आहे. शाओमीने पहिली ईलेक्ट्रीक कार शोकेस केली आहे. कुपे ईलेक्ट्रीक सेदान कारला एमआयच्या ब्रँडनेमखाली विकले जाणार आहे. याच्या किंमती आणि रेंजबाबत कंपनीने माहिती दिलेली नसून टेस्लाला टक्कर देऊ शकेल असे या कारचे रुपडे दिसत आहे.
2 / 7
शाओमीची SU7 ही कार स्वत: कंपनी बनविणार नसून ते बिजिंग ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री होल्डिंग लिमिटेड (BAIC) ही चीनमधील सहावी सर्वात मोठी ऑटो कंपनी बनविणार आहे. शाओमी एसयु ७ चे तीन व्हेरिअंट बाजारात येणार असून एसयू ७ प्रो आणि मॅक्स अशी त्याची नावे आहेत.
3 / 7
ही कार एक्वा ब्ल्यू, मिनरल ग्रे आणि वर्डेंट ग्रीन या तीन रंगांत येणार आहे. Xiaomi SU7 मध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर्स जसे की सेल्फ-पार्किंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आदी असणार आहेत. ही कार ब्रँडच्या हायपर ओएसवर चालणार आहे. या इलेक्ट्रीक सेदानची लांबी 4,997 मिमी, रुंदी 1,963 मिमी आणि उंची 1,440/1,455 मिमी असणार आहे.
4 / 7
या कारमध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात येणार आहेत. 73.6kWh लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी आणि 101kWh CTB (सेल टू बॉडी) पॅकचा पर्याय देण्यात येणार आहे.
5 / 7
या कारची अंदाजे रेंज ८०० किमी पर्यंत असेल असे सांगण्यात येत आहे. या कारनंतर शाओमी आणखी एक 150kWh बॅटरी पॅकची एसयु ७ चा व्ही ८ प्रकार लाँच करेल.
6 / 7
इलेक्ट्रिक सेडानमध्ये दोन पॉवरट्रेन पर्याय आहेत - सिंगल मोटर आणि ड्युअल मोटर. सिंगल मोटर व्हेरियंटचा टॉप स्पीड ताशी 210 किमी आहे. यात रियर-व्हील ड्राइव्ह सिस्टम असेल.
7 / 7
ड्युअल-मोटर सेटअपसह ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम आहे. त्याचा टॉप स्पीड 265 किमी प्रति तास आहे. ते 2.78 सेकंदात 0-100kmph वेग गाठू शकते.
टॅग्स :xiaomiशाओमी