So the yellow color is given to the JCB machine
...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 9:16 PM1 / 7जेसीबी मशिनचा उपयोग जगभरात केला जातो. जेसीबीच्या माध्यमातून जास्त करून खोदकाम केलं जातं. परंतु जेसीबीचा रंग पिवळाच का देण्यात आला आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. 2 / 7 खरं तर जेसीबी ही मशिन ब्रिटनच्या मशिन बनवणाऱ्या कंपनीचं उत्पादन आहे. जेसीबी तयार करणाऱ्या या कंपनीचं मुख्यालय इंग्लंडमधल्या स्टेफर्डशायर शहरात होतं. या कंपनीचा प्लांट चार महाद्वीपामध्ये पसरलेला होता. 3 / 71945मध्ये जेसीबी कोणत्याही नावाशिवाय लाँच करण्यात आली होती. ही मशीन तयार केल्यानंतर तिच्या नावासाठी बरेच दिवस विचारविमर्श करण्यात आला. त्यानंतर या मशिनचं नाव 'जोसेफ सायरिल बमफोर्ड' यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. 4 / 7जेसीबी मशिनच्या निर्मितीचा कारखाना ब्रिटिशांनी पहिल्यांदा भारतात सुरू केला होता. त्यानंतर आजमितीस भारत हा जगभरात जेसीबी मशिन निर्यात करणारा मोठा देश बनला आहे. 5 / 7या जेसीबी मशिनचा जास्तीत जास्त वेग प्रतितास 65 किलोमीटर आहे. या मशीनला प्रिन्स ऑफ वेल्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पहिल्यांदा जेसीबी मशिन पांढऱ्या आणि लाल रंगांमध्ये तयार होत होती. 6 / 7त्यानंतर त्या मशिनचा रंग बदलून पिवळा करण्यात आला. खरं तर जेसीबी खोदकामाच्या ठिकाणी सहजगत्या नजरेस पडते. 7 / 7 मग दिवस असो वा रात्र पिवळ्या रंगामुळे ती मशीन लगेचच लक्षात येते. पुढे खोदकाम सुरू आहे हे समजण्यासाठीच या मशिनला पिवळा रंग देण्यात आल्याची माहिती आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications