Suddenly the demand for Maruti Suzukis s cross SUV increased Sales up by 337 per cent
अचानक Maruti Suzuki च्या 'या' SUV ची मागणी वाढली; विक्रीत ३३७ टक्क्यांची वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 5:10 PM1 / 11प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये मारूती सुझुकी ही देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीची वाढती मागणी पाहता, कंपनीनं काही मॉडेल्स बाजारात लाँच केले होते. 2 / 11कंपनीनं लाँच केलेल्या कार्सपैकी Maruti Brezza सगमेंटची लिडर म्हणून समोर आली होती. तर दुसरीकडे Nexa शोरूमद्वारे विक्रीसाठी असलेलं प्रीमिअम क्रॉसओव्हर मॉडेल S-Cross मात्र कमाल करू शकली नव्हती. परंतु जुलै महिन्यात या कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. 3 / 11या कारच्या विक्रीबाबत सांगायचं झालं तर Maruti नं आपल्या S-Cross मॉडेलत्या एकूण 1,972 युनिट्सची जुलै महिन्यात विक्री केली आहे.4 / 11जुलै महिन्यात करण्यात आलेली विक्री ही गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात विक्री झालेल्या 431 गाड्यांच्या तुलनेत 337 टक्क्यांनी अधिक आहे. क्रॉसओव्हर लूक असलेल्या या कारची विक्री कंपनी आपल्या प्रीमिअम नेक्सा शोरूमद्वारे करते. 5 / 11Maruti S-Cross ही कार एकूण चार व्हेरिअंटमध्ये येते. यामध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या मॉडेल्सचा समावेश आहे. 6 / 11कंपनीनं या कारमध्ये 1.5 लिटर क्षमकेच्या पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 105PS ची पॉवर आणि 138Nm चा टॉर्क जनरेच करतो. 7 / 11हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येतं. कंपनीनं यामध्ये माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. या कारचं मायलेज उत्तम बनवण्यासाठी हा वापर करण्यात आला आहे. 8 / 11फीचर्सबाबत सांगायचं झालं तर या कारमध्ये रेन सेन्सिंग व्हायपर, क्रुझ कंट्रोल, LED प्रोजेक्टर हेडलँप आणि 16 इंचाचे अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. याशिवाय कंपनीनं या कारमध्ये सात इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टमही दिली आहे.9 / 11इन्फोटेन्मेंट सिस्टम अँड्राईड ऑटो आणि अॅपल कार प्ले सोबत कनेक्ट केली जाऊ शकते. परंतु या कारमध्ये कनेक्टेड टेक्नॉलॉजी मिळत नाही, जी सध्याच्या ह्युंदाई क्रेटा आणि किया सेल्टोस सारख्या कारमध्ये दिसून येते. 10 / 11या कारमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे, स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससह या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये ड्युअल फ्रन्ट एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि रिअर पार्किंग सेन्सरसारखे फीचर्स मिळतात. 11 / 11या कारची किंमत 8.39 लाख रूपयांपासून सुरू होऊन 12.39 लाख रूपयांपर्यंत जाते. सामान्यत: ही कार 18 किलोमीटर प्रति लिटरचं एव्हरेज देते. आणखी वाचा Subscribe to Notifications