शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भन्नाट...गर्दीत लोकांशी कार बोलणार; हॅक करून दाखवेल त्याला 7 कोटी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 3:58 PM

1 / 10
: टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवर नवीन कार टेस्ला मॉडेल-३ चा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ही कार पाय़ी चालणाऱ्या लोकांशी बोलताना दिसत आहे.
2 / 10
गर्दीच्या रस्त्यांवर ही कार लोकांना रस्ता सोडण्यास आणि बाजुला होण्यास सांगत आहे.
3 / 10
मस्क यांनी म्हटले आहे की, टेस्ला लवकरच लोकांशी बोलणार आहे. हे खरे आहे. हे फिचर लवकरच इलेक्ट्रीक कारमध्ये दिसणार आहे. हे पूर्णपणे ऑडिओ प्लेअरवर चालणार आहे.
4 / 10
हे नवे फिचर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित असण्याची शक्यता आहे. टेस्लाच्या कारचा वापर जे लोक उबर, ओलासाठी करतात ते लोक या फिचरचा जास्तीत जास्त वापर करू शकतील.
5 / 10
जगभरात इलेक्ट्रीक कार बनविणासाठी प्रसिद्ध असलेल्या टेस्लाने या कारची सिक्युरिटी सिस्टीम ताकदवान असल्याचे म्हटले आहे. यावर मस्क यांनी मोठी पैजच लावली आहे.
6 / 10
टेस्ला मॉडेल 3 ची सिस्टिम जो कोणी हॅक करून दाखवेल त्याला कंपनी 1 दशलक्ष डॉलर म्हणजेच 7.1 कोटी रुपये बक्षिस आणि 74 लाख रुपयांची ही कार भेट देणार आहे.
7 / 10
या मॉडेल-३ ला वेंकुलरमधील मार्चमध्ये होणाऱ्या हॅकर्सच्या स्पर्धेमध्ये उतरविण्यात येणार आहे.
8 / 10
या ठिकाणी हॅकर्स तंत्रज्ञान आणि त्यांना माहिती असलेल्या युक्त्यांद्वारे कारला हॅक करण्याचा प्रयत्न करतील. जर कोणी यामध्ये यशस्वी झाला तर त्याला कंपनी बक्षीस देणार आहे.
9 / 10
गेल्या वर्षी हॅकर्सच्या एका ग्रुपने मॉडेल-एसला हॅक केले होते. यावेळी या ग्रुपला 35000 डॉलर आणि एक कार मिळाली होती. अमाता कामा आणि रिचर्ड झोऊ यांच्या टीमने हे यश मिळविले होते.
10 / 10
टेस्लाच्या म्हणण्यानुसार ही एक चाचणी आहे ज्यामुळे सिक्युरिटी सिस्टीम सुधारण्यास मदत मिळते. या हॅकरनी टेस्लाची कार हॅक करून चुकीच्या लेनमध्ये घुसविली होती.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कार