होळीनिमित्त गाडी घेण्याचा प्लॅन करताय? मग, जाणून घ्या TATA Cars च्या किंमती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 11:59 IST
1 / 9नवी दिल्ली : भारतीय ग्राहक सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. आता होळीचा सण जवळ येत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही टाटाकडून नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कंपनीच्या सर्व कारच्या नवीन किमती जाणून घेतल्या पाहिजेत. 2 / 9दरम्यान, टाटा मोटर्सने जानेवारी 2022 मध्येच आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला टाटाच्या सर्व 7 कारच्या नवीन किमतींची माहिती देत आहोत. या कारमध्ये टाटा टियागो, टिगोर, अल्ट्रोझ, नेक्सॉन, सफारी, हॅरियर आणि गेल्या काही दिवसांपूर्वी लाँच झालेली टाटा पंच यांचा समावेश आहे.3 / 9टाटा टिआगोच्या बेस मॉडेलची किंमत 5.20 लाख रुपये आहे, जी कारच्या टॉप व्हेरियंटसाठी 7.30 लाखांपर्यंत जाते.4 / 9टाटा कंपनीने आपल्या टाटा टिगोर या कॉम्पॅक्ट सेडानच्या बेस मॉडेलची किंमत 5.80 लाख रुपये ठेवली आहे, तर कारच्या टॉप मॉडेलची किंमत 8.12 लाख रुपये आहे.5 / 9कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या मायक्रो SUV पंचची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.65 लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलसाठी 9.29 लाख रुपये आहे.6 / 9टाटा नेक्सॉन ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट SUV आहे. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 7.40 लाख रुपये आहे, तर टॉप मॉडेलसाठी 13.35 लाखांपर्यंत मोजावे लागतील.7 / 9टाटाची ही प्रीमियम हॅचबॅक ग्राहकांना खूप आवडली आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 5,99,900 रुपये आहे, टॉप मॉडेलसाठी ही किंमत 9,99,900 रुपयांपर्यंत आहे.8 / 9टाटा ने हॅरियर SUV ची सुरुवातीची किंमत 14.49 लाख रुपये ठेवली आहे, जी त्याच्या टॉप मॉडेलसाठी 21.34 लाख रुपयांपर्यंत जाते.9 / 9काही दिवसांपूर्वी कंपनीने टाटा सफारी बाजारात परत आणली आहे, ज्याची बेस व्हेरिएंट 14.99 लाख रुपयांना उपलब्ध असेल, तर कारच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 23.20 लाख रुपये आहे.