शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata Altroz CNG: दमदार पॉवर अन् जबरदस्त सेफ्टी; Tata ने लॉन्च केले सर्वात सुरक्षित कारचे CNG मॉडेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 6:19 PM

1 / 7
Tata Motors ने आज अखेर भारतीय बाजारात आपल्या प्रीमियम हॅचबॅक Altroz कारचे नवीन CNG व्हेरिएंट लॉन्च केले आहे. काही दिवसांपूर्वीच या कारची अधिकृत बुकिंग सुरू झाली होती. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनने सुसज्ज या कारची किंमत 7.55 लाख रुपये (एक्स-शोरुम) पासून सुरू होते. या कारची प्रामुख्याने Maruti Baleno CNG शी स्पर्धा असेल. ही देशातील पहिली CNG कार आहे, ज्यात ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्हाला कारच्या बूट स्पेसशी तडजोड करावी लागणार नाही.
2 / 7
दिसायला ही मूळ अल्ट्रॉज मॉडेलसारखीच आहे. कारच्या एक्सटेरिअरमध्येही कोणताच बदल करण्यात आला नाही. फक्त यात 'iCNG' बॅजिंग दिली आहे. टाटा मोटर्सने यात 30-30 लीटरचे दोन CNG टँक दिले आहे, ज्यामुळे तुम्हाला बूटमध्ये चांगलीच जागा मिळेल. यामुळे तुम्हाला कारच्या बूटमध्ये सूमारे 210 लिटरचा बूट स्पेस मिळेल. स्टँडर्ड अल्ट्रॉज (पेट्रोल-डिझेल) मध्ये 345 लिटर बूट स्पेस मिळते, तर या CNG व्हेरिएंटमध्ये 135 लिटर कमी स्पेस मिळेल.
3 / 7
कंपनीने या कारमध्ये 1.2L रेव्होट्रॉन बाय-फ्यूअल इंजिन दिले आहे, जे पेट्रोल मोडमध्ये 88Ps पॉवर आणि 115Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच, याच्या CNG मोडमध्ये इंजिन 73.5 Ps पॉवर आणि 103Nm टॉर्क जनरेट करते. या कारचे मायलेज 23-25 किलोमीटर असण्याचा अंदाज आहे. या प्रीमियम सीएनजी हॅचबॅकमध्ये सिंगल अॅडव्हान्स इयूसी आणि डायरेक्ट स्टेट सीएनजीसारखे फीचर्सदेखील मिळतात.
4 / 7
आवाजावर सनरूफ उघडणार: कंपनीने या सीएनजी कारमध्ये व्हॉइस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरुफ दिला आहे, जो आवाजावर ऑपरेट होतो. अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅक असल्यामुळे याच्या सीएनजी व्हेरिएंटमध्येही हे फिचर देण्यात आले आहे. याशिवाय कंपनी या कारमध्ये इतर अनेक जबरदस्त सेफ्टी फीचर्स देत आहे.
5 / 7
टाटा मोटर्सने या सीएनजी कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर दिले आहेत. याच्या फ्यूअल लीडमध्ये एक मायक्रो स्विच आहे. जेव्हा तुम्ही पेट्रोल किंवा सीएनजी भरण्यासाठी जाता, तेव्हा हे मायक्रो स्विच कारचे इंजिन बंद करते. सुरक्षेच्या दृष्टीने हे फीचर खूप चांगले आहे. याशिवाय कारमध्ये CNG लीक डिटेक्शन सिस्टीमदेखील आहे.
6 / 7
सुरक्षेच्या दृष्टीने याचे रेग्युलर पेट्रोल-डिझेल मॉडेल देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक कार आहे. ग्लोबल NCAP मध्ये या कारला 5-स्टार रेटिंग मिळली आहे. याच्या सीएनजी व्हेरिएंटमधून तीच आशा आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) सोबत अॅटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि स्टेबिलिटी कंट्रोलसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
7 / 7
Altroz iCNG ला XE, XM+, XM+(S), XZ, XZ+(S) आणि XZ+O(S) अशा सहा व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. ही कार तुम्हाला ओपेरा ब्लू, डाउनटाउन रेड, आर्केड ग्रे आणि एव्हेन्यू व्हाइट कलरमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या कारसोबत 3 वर्ष किंवा 1,00,000 किलोमीटरची वॉरंटी देत आहे.
टॅग्स :TataटाटाcarकारAutomobileवाहन