tata altroz records sales increased by 557 percent in march 2021
Tata Altroz चा बाजारात बोलबाला; मार्च महिन्याच्या विक्रीत तब्बल ५५७ टक्क्यांनी वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 5:10 PM1 / 10गेल्या काही महिन्यांपासून Tata कंपनीच्या विविध वाहनांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद आणि पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Tata Altroz Records 557 percent Growth in March)2 / 10तसेच Tata कंपनी आपली वाहने अद्ययावत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह भारतीय बाजारात लॉंच करताना दिसत आहे. अशीच एक टाटाची उत्तम गाडी म्हणजे Tata Altroz. 3 / 10Tata Altroz ने मार्च महिन्यात आपले विक्रीचे सर्व रेकॉर्ड्स मोडून काढल्याचे पाहायला मिळत आहे. Tata कंपनीने मार्च २०२१ या एका महिन्यात अल्ट्रोझच्या विक्रीत तब्बल ५५७ टक्के वाढ साध्य केली आहे. (Tata Altroz sales increases in March 2021)4 / 10Tata Motors ने आपल्या प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz च्या तब्बल ७ हजार ५५० युनिट्सची विक्री केली आहे. गतवर्षीच्या म्हणजेच मार्च २०२० मध्ये कंपनीने अल्ट्रोझच्या केवळ एक हजार १४७ युनिट्सची विक्री केली होती. 5 / 10मासिक विक्रीचा विचार केल्यास Tata ने एकूण ११ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यात Tata Altroz च्या ६ हजार ८३२ युनिट्सची विक्री केली होती.6 / 10Tata ने गतवर्षीच्या जानेवारी महिन्यात Tata Altroz लाँच केली होती. काही आठवड्यांतच ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरली. परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे या गाडीची विक्री मंदावली. 7 / 10गेल्या काही महिन्यांत Tata Altroz ने व्रिक्रीत विक्रमी आकडेवारी नोंदवल्याचे पाहायला मिळाले. ही गाडी ७ व्हेरिएंट्स आणि तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध करून देण्यात आली आहे. 8 / 10Tata Altroz ची किंमत ५.६९ ते ९.४५ लाख रुपयांच्या एक्स शोरूम दरम्यान आहे. यामध्ये सेव्हन इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली असून, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एम्बियंट लायटिंग यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 9 / 10तसेच Tata Altroz मध्ये स्टियरिंग माउंट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, ४ एअरबॅग्ज, चाइल्ड सीट अँकर, रिअर पार्किंग सेन्सर आणि स्पीड अॅलर्ट सिस्टम, यांसारखे फिचर्सही मिळतात. 10 / 10Tata Altroz प्रमाणे Tata Tigor या गाडीनेही मार्च महिन्यात तब्बल १ हजार ५९१ टक्के विक्रीची नोंद केली आहे. मार्च महिन्यात या गाडीच्या २ हजार ०९७ युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications