शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ratan Tata-Tata Indica: पहिल्या स्वदेशी डिझेल कारची २५ वर्ष! रतन टाटा आठवणीत रमले; भावूक पोस्ट करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 1:25 PM

1 / 9
देशाच्या वाहन क्षेत्रात काळानुरूप सातत्याने बदल होत आहेत. आजच्या घडीला भारतीय रस्त्यांवर अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या एकापेक्षा एक कार आपण पाहतो. नव्वदीच्या दशकातील उत्तरार्धात टाटा मोटर्सने परवडणारी हॅचबॅक टाटा इंडिका (Tata Indica) ही देशातील पहिली डिझेल कार म्हणून लॉन्च केली होती. या कारच्या लॉंचिंगला आता २५ वर्षे होत आहेत.
2 / 9
टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांनी इन्स्टाग्रामवर या कारविषयी आठवणी जागवल्या आहेत. अधिकृत इंस्टाग्रामवरून रतन टाटांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी इंडिका कारसोबत घेतलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत रतन टाटा यांनी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे, जी नेटकऱ्यांकडून खूप पसंत केली जात आहे.
3 / 9
टाटा कंपनीने टाटा इंडिका कार १९९८ मध्ये पहिल्यांदा लॉन्च केली होती. डिझेल इंजिनसह आलेली ही देशातील पहिली हॅचबॅक कार होती. टाटा इंडिकाला स्वदेशी कार असल्याचा टॅग देण्यात आला आहे. याचे कारण ती पूर्णपणे देशातच डिझाइन आणि विकसित करण्यात आली होती. तज्ज्ञांच्या मते या कारने भारतातील प्रवासी कारचा पाया घातला. ही कार देशात प्रचंड लोकप्रिय ठरली होती.
4 / 9
नवीन वर्ष सुरू होणार होते. ३० डिसेंबर १९९८ रोजी टाटा मोटर्सने आपली नवीन टाटा इंडिका भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. ही हॅचबॅक कार त्यावेळी २.६ लाख रुपयांच्या किमतीत सादर करण्यात आली होती. या कारने अल्पावधीतच १ लाख युनिट्सचा बुकिंग आकडा पार केला होता.
5 / 9
ही कार बाजारात येण्याआधीच या कारविषयी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. शेवटी कंपनीने रतन टाटा यांना त्यावेळी अपेक्षेप्रमाणे कार सादर केली. टाटा इंडिका पहिल्यांदा १९९८ च्या ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती. खास लुक आणि शार्प डिझाईनमुळे ही कार पहिल्याच नजरेत लोकांना आवडली होती.
6 / 9
मार्केटमध्ये आल्यानंतर या कारने त्यावेळी मारुती 800, मारुती झेनसारख्या कारना तगडी टक्कर दिली. टाटा इंडिकाचे डिझेल व्हेरियंट त्याच्या उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखले जात होते. त्यावेळी डिझेल इंधनाचा खर्चही खूप कमी होता.
7 / 9
टाटा इंडिकाची डिझेल आवृत्ती उत्कृष्ट मायलेजसाठी प्रसिद्ध झाली आणि प्रत्येक नवीन कार खरेदीदार या कारकडे आकर्षित झाला. या कारच्या लॉंचिंगला २५ वर्षे झाल्याबाबत खुद्द रतन टाटा यांनी आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून एक खास फोटो शेअर केला असून, एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.
8 / 9
आपल्या पोस्टमध्ये रतन टाटा म्हणतात की, पंचवीस वर्षांपूर्वी, टाटा इंडिका लाँच करणे हा भारताच्या स्वदेशी प्रवासी कार उद्योगाचा जन्म होता, याने माझ्या आठवणींना उजाळा दिला आणि माझ्या हृदयात माझ्यासाठी विशेष स्थान आहे.
9 / 9
नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात, टाटा मोटर्सने आपली परवडणारी हॅचबॅक टाटा इंडिका ही देशातील पहिली डिझेल कार म्हणून लॉन्च केली. सध्या ऑटो एक्स्पोची १६ वी आवृत्ती सुरू आहे. या कारचा एक फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टॅग्स :TataटाटाRatan Tataरतन टाटा