शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA चा धुमाकूळ! ‘या’ ६ कारचा देशात बोलबाला; होतेय सर्वाधिक विक्री, पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 7:58 PM

1 / 10
एकीकडे सेमीकंडक्टरच्या वाढत्या चणचणीमुळे वाहन उद्योगावर नवे संकट घोंघावताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून Tata मोटर्सचा बोलबाला कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. Tata मोटर्सने कात टाकली आहे. एकापेक्षा एक जबरदस्त कार टाटा लाँच करत आहे.
2 / 10
देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांना मागे टाकत Tata मोटर्सने सप्टेंबर २०२१ च्या विक्रीत २८ टक्के वाढ नोंदवली आहे. तर गेल्या तिमाहीचा विचार करता Tata मोटर्सची वाहन विक्री ५५ टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
3 / 10
एकापेक्षा एक जबरदस्त कार सादर करत असलेल्या Tata Motors ने सप्टेंबर महिन्यात ५५ हजार ९८८ वाहनांची विक्री केली असून, गतवर्षी याच महिन्यात Tata Motors ने ४४ हजार ४१० युनिट विकले होते. तर, जुलै ते सप्टेंबर २०२१ या तिमाहीचा विचार केल्यास Tata Motors च्या वाहन विक्रीत ५५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
4 / 10
सप्टेंबर महिन्यात तर Tata मोटर्सची मध्यम आकाराची एसयूव्ही Tata Nexon देशातली सर्वात जास्त विक्री होणारी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे. भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आली आहे.
5 / 10
Tata मोटर्स भारतात हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही सेगमेंटमध्ये ६ शानदार कार विकते. यासह, टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्येही काही जबरदस्त कार उतरवल्या आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने Tata Nexon च्या सर्वाधिक ९२११ युनिट्सची विक्री झाली.
6 / 10
Tata Altroz ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. गेल्या महिन्यात एकूण ५७७२ अल्ट्रोझ कार कंपनीने विकल्या. त्यापाठोपाठ Tata Tiago आहे, कंपनीने एकूण ५१२१ टियागो कार सप्टेंबर २०२१ मध्ये विकल्या.
7 / 10
Tata मोटर्सची दमदार एसयूव्ही हॅरियर आणि सफारीची देखील भारतात चांगली डिमांड आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीने Tata Harrier च्या एकूण २८२१ युनिट्सची विक्री केली. वार्षिक आधारे हॅरियरच्या विक्रीत ६६ टक्के इतकी मोठी वाढ झाली.
8 / 10
तर, कंपनीने एकूण १५०० Tata Safari एसयूव्ही विकल्या. टाटा मोटर्सची सेडान कार Tata Tigor च्या १३०४ युनिट्सची विक्री झाली. या कारच्या विक्रीत २८ टक्के वार्षिक वृद्धी झाली. टाटा टिआगो वगळता कंपनीच्या सर्वच कारच्या विक्रीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.
9 / 10
तसेच कंपनीने आतापर्यंत १० हजारपेक्षा जास्त Nexon EV, Tigor EV आणि Xpres-T या इलेक्ट्रिक कार देखील विकल्या आहेत. देशात आताच्या घडीला EV सेगमेंटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत असलेल्या TATA मोटर्सच्या Tata Nexon, Tata Tigor या कारची इलेक्ट्रिक व्हर्जन प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत.
10 / 10
याशिवाय आतापर्यंतच्या इलेक्ट्रिक सेगमेंट सेलमध्ये Tata नेच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता TATA ने Tata Punch SUV च्या EV व्हर्जनबाबत महत्त्वाचे आणि सूचक विधान केले आहे. त्यामुळे Tata Punch लाही इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्याची क्षमता आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
टॅग्स :TataटाटाRatan Tataरतन टाटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग