शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA ने कमालच केली! ‘छोटा हाथी’चा इलेक्ट्रिक अवतार लाँच; ई-कार्गो मोबिलीटीत नवा युगारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 6:49 PM

1 / 9
TATA समूह आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. यातच टाटा मोटर्सने एप्रिल महिन्यात विक्रीत दमदार कामगिरी केली आहे. तसेच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही आपली आघाडी कायम ठेवली आहे.
2 / 9
टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने भारतातील १७ वर्षांनंतर छोटा हाथी म्हणून अत्‍यंत लोकप्रिय असलेल्या TATA ACE चे इलेक्ट्रिक व्‍हर्जन लाँच केले आहे.
3 / 9
नवीन, क्रांतिकारी एस ईव्‍हीच्‍या लाँचसह स्थिर गतीशीलतेला चालना देण्‍याप्रती त्‍यांच्‍या मोहिमेमध्‍ये लक्षणीय झेप घेतली. भारतातील सर्वांत प्रगत, शून्‍य-उत्‍सर्जन, चारचाकी स्‍मॉल कमर्शियल वेईकल नवीन एस ईव्‍ही हरित व स्‍मार्ट परिवहन सोल्‍यूशन आहे, जे विविध आंतर-शहरीय उपयोजनांना सेवा देण्‍यास सज्‍ज आहे.
4 / 9
ई-मोबिलिटी ही एक संकल्‍पना आहे, जिची वेळ आता आली आहे. टाटा मोटर्समध्‍ये आम्‍ही पॅसेंजर कार्स, व्‍यावसायिक वाहने व जग्‍वार लँड रोव्‍हरमध्‍ये या परिवर्तनाचे नेतृत्‍व करण्‍यासाठी जलदगतीने व विस्तार साधत पुढे जात आहोत.
5 / 9
TATA ACE EV च्‍या लाँचसह आम्‍ही ई-कार्गो मोबिलिटीच्‍या नवीन युगामध्‍ये प्रवेश करत आहोत. टाटा एस ही भारतातील आतापर्यंतची सर्वांत यशस्‍वी कमर्शियल व्हेईकल आहे. या व्हेईकलने परिवहनामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे आणि वर्षानुवर्षे लाखो यशस्‍वी उद्योजकांना पाठबळ दिले आहे.
6 / 9
TATA ACE EV व्हेईकल तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत, शुद्ध व स्‍मार्ट मोबिलिटी सोल्‍यूशन देत या वारसाला अधिक दृढ करेल. कमर्शियल वेईकल्‍सच्‍या इलेक्ट्रिफिकेशनबाबत उत्‍सुक आहे, असे टाटा सन्‍स आणि टाटा मोटर्सचे अध्‍यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
7 / 9
TATA ACE EV टाटा मोटर्सचे ईव्‍होजेन पॉवरट्रेन असलेले पहिले उत्‍पादन आहे, जे अद्वितीय प्रमाणित १५४ किलोमीटर्सची रेंज देते. या वेईकलमध्‍ये सुरक्षित, सर्व वातावरणामध्‍ये अनुकूल कार्यसंचालनासह ड्रायव्हिंग रेंज वाढवण्‍यासाठी प्रगत बॅटरी कूलिंग सिस्टिम व रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग सिस्टिम आहे.
8 / 9
तसेच TATA ACE EV उच्‍च अपटाइमसाठी नियमित व जलद चार्जिंग क्षमता आहेत. तसेच अधिक भार असताना व्हेईकल सुलभपणे ड्राइव्‍ह करता येते. एस ईव्‍हीचे कंटेनर वजनाने हलके व टिकाऊ साहित्‍यापासून बनवण्‍यात आले आहे, जे ई-कॉमर्स लॉजिस्टिक्‍सच्‍या आवश्‍यकतांसाठी परिपूर्ण आहे.
9 / 9
टाटा मोटर्सने आघाडीच्‍या ई-कॉमर्स कंपन्‍या व लॉजिस्टिक्‍स सेवा प्रदाते – अॅमेझॉन, बिगबास्‍केट, सिटी लिंक, डॉट, फ्लिपकार्ट, लेट्स ट्रान्‍सपोर्ट, मूव्हिंग आणि यलो ईव्‍ही यांच्‍यासोबत धोरणात्‍मक सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केल्‍याची घोषणा केली. विशेष म्हणजे लाँचच्याच दिवशी ३९ हजार युनिटची बुकिंग मिळाली आहे. एकदा चार्ज केल्यावर १५४ किमीची रेंज मिळू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
टॅग्स :Tataटाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर