शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA मोटर्स सुपरहीट! वाहन विक्रीत ६५ टक्क्यांची वाढ; EV मध्येही टॉप, मारुती, ह्युंदाईला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 7:06 PM

1 / 9
आताच्या घडीला TATA ग्रुपचा भारतीय बाजारासह शेअर मार्केटमध्ये मोठा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून टाटा मोटर्सची वाहन विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्येही टाटाच टॉपला आहे.
2 / 9
भारतीय वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सने एक स्वदेशी ब्रँड म्हणून भारतीय कार प्रेमींची नाडी पकडली आहे. त्यामुळेच दर महिन्याला टाटाच्या भारतात मोठ्या संख्येने कार विकल्या जातात. आगामी काळात टाटा दुसरी सर्वांत मोठी वाहन विक्री कंपनी होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
3 / 9
आता भारतीय बाजारात मारुती सुझुकी या कंपनीचा दबदबा कायम आहे. विक्रीच्या बाबतीत ही कंपनी वर्चस्व राखून आहे. तर कोरियन वाहन निर्माती कंपनी ह्युंदाई दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु गेल्या काही महिन्यातील विक्रीचे आकडे पाहिले तर लक्षात येईल की टाटा मोटर्सने ह्युंदाई मोटर कंपनीसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
4 / 9
टाटा मोटर्सने एप्रिल २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणावर कार विकल्या आहेत आणि वार्षिक ६५ टक्के वाढ नोंदवली आहे. मार्च २०२२ च्या तुलनेत एप्रिलमध्ये टाटाच्या कारच्या विक्रीत किंचीत घट झाली आहे. अलीकडेच टाटा मोटर्सने आपली नवीन इलेक्ट्रिक कार टाटा अविन्याचे अनावरण केले आहे.
5 / 9
टाटा मोटर्सने देशांतर्गत कार निर्मात्या कंपनीने गेल्या महिन्यात ४१,५८७ कार विकल्या आहेत, ही संख्या मार्च २०२२ च्या तुलनेत १.६७ टक्क्यांनी कमी आहे. एप्रिल २०२१ च्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये टाटाच्या कारच्या विक्रीत तब्बल ६६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
6 / 9
गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२१ मध्ये टाटा मोटर्सने केवळ २५,०९५ गाड्या विकल्या होत्या, पण या वर्षी एप्रिलमध्ये त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सेमीकंडक्टर आणि चीपच्या कमतरतेच्या समस्येमुळे सर्व कार कंपन्या प्रचंड त्रस्त असताना, टाटा मोटर्सच्या कारच्या विक्रीत फारशी अस्थिरता दिसून आलेली नाही.
7 / 9
टाटा मोटर्सच्या अनेक कार वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉनचे वर्चस्व असताना, मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा हॅरियर आणि ७ सीटर कार सेगमेंटमध्ये टाटा सफारीची चांगली विक्री होत आहे.
8 / 9
इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये, टाटा नेक्सॉन ईव्ही आणि टिगॉर ईव्ही टॉपला आहेत. तर नुकत्याच लाँच झालेल्या टियागो सीएनजी आणि टिगॉर सीएनजी देखील आपापल्या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत.
9 / 9
लवकरच पंच सीएनजी आणि नेक्सॉन सीएनजी सारख्या कार देखील सीएनजी कार सेगमेंटमध्ये कंपनीचे स्थान मजबूत करण्यासाठी सज्ज आहेत.
टॅग्स :Tataटाटा