Tata Group's philanthropic work done by Sir Ratan tata
अवघ्या टाटा समुहाला दानशूरपणाचा वसा देऊन गेले, अल्पायुषी सर रतन टाटा... By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 8:10 AM1 / 12सर रतन टाटा यांना टाटा समुहाच्या समाजसेवेचे रतन म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते जमशेदजी टाटा यांचे धाकटे पूत्र आणि नवल टाटा यांचे वडील होत. म्हणजेच सध्याचे टाटा समुहाचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे आजोबा. अशा या समाजसेवेचे व्रत अंगी असलेल्या सर रतन टाटा यांना अल्पायुष्यच लाभले, मात्र त्यांनी तेवढ्या आयुष्यातही एवढी मोठी कामे केली आणि टाटा समुहासाठी मोठी संपत्ती सोडून गेले. 2 / 12टाटा समुहाला उभे करण्यात जी चार व्यक्तीमत्वे आहेत, त्यापैकीच सर रतन टाटा हे एक आहेत. जमशेदजी टाटा, दोराबजी टाटा आणि रतनजी दादाभाई टाटा असे अन्य तीन व्यक्तीमत्व आहेत. सर रतन टाटा हे रतनजी या नावाने लोकप्रिय होते. 3 / 12त्यांचा जन्म 20 जानेवारी 1871 मध्ये झाला होता. त्यांना मुलबाळ नव्हते. रतनजी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नवजबाई यांनी त्यांच्याच नात्यातातील एका अनाथ मुलाला म्हणजेच नवल यांना दत्तक घेतले. आताचे रतन टाटा याच नवल यांचे मुलगे आहेत. 4 / 12तर सर रतनजी यांनी सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. मोठे भाऊ दोराबजी टाटा यांच्यापेक्षा ते 12 वर्षांनी छोटे होते. त्यांनी टाटा अँड सन्सला 1896 मध्ये जॉीन केले. 1904 मध्ये वडीलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी फ्रान्सची कंपनी युनियन फायर इन्शुरन्सकंपनीचे काम पाहण्यास सुरुवात केली. या कंपनीला टाटा अँड सन्सने भागीदारीत आणले होते. 5 / 121912 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी साचीमध्ये सुरु केली. यानंतर 1915 मध्ये मुंबईजवळ मोठा जलविद्युत प्रकल्प सुरु केला. त्यांनी समाजकार्य करण्यासाठी टाटा ट्रस्ट फंडची स्थापना केली. जो आज टाटा ट्रस्टचा दुसरा सर्वात मोठा फंड आहे. 6 / 12जेव्हा महात्मा गांधींनी आफ्रिकेमध्ये वर्णवादाविरोधात आंदोलन केले तेव्हा त्या आंदोलनाला टाटा यांनी 1.25 लाख रुपयांची मदत केली होती. ते स्वातंत्र सैनिक व समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांचे मित्र होते. त्यांनी गोखले यांच्या कामांसाठीदेखील दहा वर्षे प्रत्येकी 10000 रुपयांची मदत दिली होती. 7 / 12लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 400 पाऊंडची मदत देत होते. या चेअरला आता 'सर रतन टाटा फाउंडेशन' चे नाव देण्यात आले आहे. 8 / 121913 ते 1917 मध्ये पाटलिपुत्र (पटना)मध्ये पहिली पुरातत्व खोदकाम होणार होते. यासाठी त्यांनी पैशांची मदत केली. या खोदकामात सम्राट 100 स्तंभांचा मौर्यकालीन दरबार सापडला होता. 9 / 121905मध्ये त्यांच्याच मदतीने म्हैसूरमध्ये इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंटिफिक अँड मेडिकल रिसर्चची स्थापना करण्यात आली. 10 / 12बॉम्बे नगर निगमद्वारे सुरु केलेल्या किंग जॉर्ज पंचम अँटी ट्यूबरक्युलॉसिस लीगसाठी दहावर्षांपर्यंत 10000 रुपये दान केले. 11 / 12त्यांची समाजसेवा पाहून ब्रिटीश सरकारने त्यांना 1916 मध्ये नाइटहुड म्हणजेच सर ही उपाधी दिली. 12 / 12अवघ्या टाटा समुहाला समाजसेवेचा वसा शिकविणाऱे थोर रतनजी हे अल्पायुषी ठरले. 5 सप्टेंबर 1918 मध्ये त्यांचे इंग्लंडमध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांची बहुतांश संपत्ती समाजोपयोगी कामासाठी दान देम्यात आली. यानंतर 1919 मध्ये 80 लाख रुपयांचा फंड देऊन सर रतन टाटा ट्रस्टची स्थापना करण्यात आली. आणखी वाचा Subscribe to Notifications