tata motors amity university m tech degree in ev tech electric vehicle nexon ev tigor ev
EV टेक्नोलॉजीमध्ये M-Tech करु शकणार विद्यार्थी, Tata Motors देणार नोकरीची संधी! By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 2:32 PM1 / 8देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक चारचाकी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने ईव्ही तंत्रज्ञानामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी भारतातील प्रमुख संस्था एमिटी विद्यापीठाशी हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्यांनी एक भागीदारी करार केला असून यातून इलेक्ट्रिक वाहन उद्योगात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना एम-टेक पदवी प्रदान केली जाणार आहे.2 / 8एमिटी युनिव्हर्सिटीच्या लखनऊ कॅम्पसमधून हा कोर्स करता येतो. यामध्ये टाटा मोटर्स पदवीसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लखनऊ येथील प्लांटमध्ये काम करण्याची संधी देणार आहे. 3 / 8ईव्ही तंत्रज्ञानातील एम-टेक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये शिकवली जातील. यामुळे केवळ ईव्ही क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार नाही, तर देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळही वाढेल.4 / 8दोन वर्षे आणि चार सेमिस्टरचा हा अभ्यासक्रम दोन भागात शिकविला जाणार आहे. पहिला भाग तांत्रिक अभिमुखता (Technical Orientation) असेल, ज्यामध्ये या तंत्रज्ञानाशी संबंधित सिद्धांत शिकवला जाईल. दुसऱ्या भागात प्रात्यक्षिक (practical) सत्रे असतील.5 / 8“टाटा मोटर्स कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे जे आमच्या भागधारकांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यास सक्षम असेल. एमिटी युनिव्हर्सिटीसोबतची ही भागीदारी केवळ करिअरच्या विकासासाठीच नव्हे तर आमच्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उघडेल. यामुळे भविष्यासाठी मनुष्यबळ तयार होण्यासही मदत होईल.”, असं टाटा मोटर्सचे अध्यक्ष आणि सीएचआरओ रवींद्र कुमार जीपी म्हणाले.6 / 8“या सहयोगी कार्यक्रमावर टाटा मोटर्ससोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. हा परस्पर फायदेशीर उपक्रम ज्ञानाच्या समृद्ध देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल आणि विद्यार्थ्यांना नवीन उद्योग कौशल्ये शिकण्याची संधी देईल”, असं एमिटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरु प्रोफेसर सुनील धनेश्वर म्हणाले. 7 / 8Tata Motors सध्या इलेक्ट्रिक फोर-व्हीलर सेगमेंटमध्ये 80 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेसह भारतातील EV शर्यतीत आघाडीवर आहे. सध्या, कंपनीचे दोन मॉडेल Nexon EV आणि Tigor EV या भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कार आहेत. 8 / 8टाटा मोटर्सने नुकतेच Nexon EV Max लाँच केली आहे. ही Nexon EV अधिक शक्तिशाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications