TATA Motors Announces Big Discount On Their Various Cars; see the offer list
TATAने केली मोठ्या डिस्काउंटची घोषणा; उरलेल्या पैशात खरेदी कराल एक टू-व्हिलर, पाहा ऑफर लिस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 6:26 PM1 / 7 Tata Cars August 2022 Discounts: टाटा मोटर्सने ऑगस्ट महिन्यात त्यांच्या कारवर मिळणाऱ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. कंपनीने याला ओणम ऑफर्स असे नाव दिले आहे. कंपनी आपल्या 5 वेगवेगळ्या मॉडेल्सवर 60,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. म्हणजेच डिस्काउंटच्या पैशात तुम्ही एखादी दुचाकीही घेऊ शकता. 2 / 7 ज्या मॉडेल्सवर सूट दिली जात आहे त्यात टाटा हॅरियर, टाटा सफारी, टाटा अल्ट्रोझ, टाटा टियागो आणि टाटा टिगोर यांचा समावेश आहे. हे फायदे कॅश, एक्सचेंज आणि कॉर्पोरेट डिस्काउंट अंतर्गत दिले जातील. 31 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी कार स्टॉकमध्ये असेल तरच ऑफर लागू होतील. या सर्व कारवर मिळणाऱ्या सवलतींबद्दल एक-एक करून जाणून घेऊया.3 / 7 Tata Harrier: Rs.60,000 पर्यंत सूट- टाटा आपल्या Harrier SUV वर एकूण 60,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. हॅरियरवर 3 ते 5 आठवडे म्हणजेच कमाल 35 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. हा प्रतीक्षा कालावधी त्याच्या सर्व ट्रिमवर लागू आहे. हॅरियरची एक्स-शोरूम किंमत रु. 14.69 ते रु. 22.04 लाख आहे. याला सर्व प्रकारच्या ट्रान्समिशनमध्ये खरेदी केले जाऊ शकते.4 / 7 Tata Safari: Rs.60,000 पर्यंत सूट- टाटा या SUV वर एकूण 60,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. सफारीवर 3 ते 5 आठवडे म्हणजेच कमाल 34 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. हा प्रतीक्षा कालावधी त्याच्या सर्व ट्रिमवर लागू आहे. सफारीची एक्स-शोरूम किंमत 15.34 ते 23.5 लाख रुपये आहे. यालाही सर्व प्रकारच्या ट्रान्समिशनमध्ये खरेदी केले जाऊ शकते.5 / 7 Tata Altroz: 25,000 रुपयांपर्यंत सूट- टाटा या कारवर एकूण 25,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Altroz वर 3 ते 10 आठवडे म्हणजेच कमाल 70 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. हा प्रतीक्षा कालावधी डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही मॉडेल्सवर लागू आहे. Altroz ची एक्स-शोरूम किंमत 6.30 ते 10.25 लाख रुपयांपर्यंत आहे. याला एमटी आणि डीसीटी ट्रान्समिशनमध्ये खरेदी केले जाऊ शकते.6 / 7 Tata Tiago: 25,000 रुपयांपर्यंत सूट- टाटा या कारवर एकूण 25,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. टियागोवर 3 ते 20 आठवडे म्हणजेच कमाल 140 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. हा प्रतीक्षा कालावधी XE, XM/XT, XZ+ सह सर्व प्रकारांवर लागू आहे. Tiago ची एक्स-शोरूम किंमत 5.39 ते 7.81 लाख रुपये आहे. याला एमटी आणि एएमटी दोन्ही ट्रान्समिशनमध्ये खरेदी केले जाऊ शकते.7 / 7 Tata Tigor: 20,000 रुपयांपर्यंत सूट- टाटा या कारवर एकूण 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. टिगोरवर 6 ते 12 आठवडे म्हणजेच कमाल 84 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. सीएनजी आणि पेट्रोल मॉडेल्सवर हा प्रतीक्षा कालावधी लागू आहे. टिगोरची एक्स-शोरूम किंमत 5.99 ते 8.58 लाख रुपये आहे. याला एमटी आणि एएमटी दोन्ही ट्रान्समिशनमध्ये खरेदी केले जाऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications