tata motors auto sales grow in september 2021 maruti suzuki hyundai mahindra saw decline
TATA ची बाजी! Maruti, Mahindra ला धोबीपछाड देत विक्रीत नोंदवली ५५ टक्क्यांची वाढ; पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 10:29 AM1 / 12गेल्या अनेक महिन्यांपासून Tata मोटर्सचा बोलबाला कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. Tata मोटर्सने खरोखरच कात टाकली आहे. एकापेक्षा एक जबरदस्त कार टाटा लाँच करत आहे. 2 / 12एकीकडे सेमीकंडक्टरच्या वाढत्या चणचणीमुळे वाहन उद्योगावर नवे संकट घोंघावताना पाहायला मिळत आहे. देशात वाहन विक्रीत आघाडीवर असलेल्या Maruti Suzuki India ला सप्टेंबर महिन्यात मोठा फटका बसला आहे. 3 / 12Maruti Suzuki च्या वाहन विक्रीत सप्टेंबर महिन्यात ४६ टक्क्यांची घसरण झाली असून, यानंतर Hyundai कंपनीची वाहन विक्रीत २४ टक्क्यांनी खाली आली आहे. तर, Mahindra ची वाहन विक्री १२ टक्क्यांनी घटली आहे. 4 / 12मात्र, देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांना मागे टाकत Tata मोटर्सने सप्टेंबर २०२१ च्या विक्रीत २८ टक्के वाढ नोंदवली आहे. तर गेल्या तिमाहीचा विचार करता Tata मोटर्सची वाहन विक्री ५५ टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 5 / 12Maruti Suzuki India ने सप्टेंबर महिन्यात एकूण ८६ हजार ३८० वाहनांची विक्री केली. गतवर्षी कोरोना संकटातही याच सप्टेंबर महिन्यात मारुतीने १ लाख ६० हजार ४४२ वाहने विकली होती. सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे मारुतीला मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. 6 / 12Maruti Suzuki च्या Alto आणि S-Presso या छोट्या कारच्या विक्रीतही घट झाली असून, सप्टेंबर महिन्यात १४ हजार ९३६ कार विकण्यात आल्या. गतवर्षी याच कालावधीत २७ हजार २४६ युनिट विक्री करण्यात आले होते. दुसरीकडे, WagonR, Swift, Celerio, Ignis, Baleno, Dzire या कारच्या विक्रीतही घसरण पाहायला मिळाली आहे. 7 / 12Hyundai कंपनीच्या वाहन विक्रीत २४ टक्के घसरण झाली असून, सप्टेंबर महिन्यात Hyundai ने ४५ हजार ७९१ युनिट विक्री केली आहे. गतवर्षी याच कालावधीत Hyundai च्या ५९ हजार ९१३ कार विकल्या गेल्या होत्या. 8 / 12Mahindra & Mahindra कंपनीच्या वाहन विक्रीतही सप्टेंबर महिन्यात १२ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून, या महिन्यात १३ हजार १३४ वाहनांची विक्री करण्यात आली आहे. गतवर्षी याच कालावधीत Mahindra ने १४ हजार ८५७ युनिटची विक्री केली होती.9 / 12एकापेक्षा एक जबरदस्त कार सादर करत असलेल्या Tata Motors ने सप्टेंबर महिन्यात ५५ हजार ९८८ वाहनांची विक्री केली असून, गतवर्षी याच महिन्यात Tata Motors ने ४४ हजार ४१० युनिट विकले होते. त्यामुळे यंदाच्या विक्रीत २८ टक्के वाढ नोंदवली आहे. तर, जुलै ते सप्टेंबर २०२१ या तिमाहीचा विचार केल्यास Tata Motors च्या वाहन विक्रीत ५५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 10 / 12सप्टेंबर महिन्याच्या वाहन विक्रीत Tata मोटर्ससह Skoda, Kia India, MG Motor या कंपन्यांच्या वाहन विक्रीत वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून Tata Punch या कारबाबतची उत्सुकता अगदी शिगेला गेली आहे.11 / 12नेक्सॉन, हॅरियर आणि अल्ट्रोज यांचे मिश्रण म्हणजे ही कार असल्याचे सांगितले जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला Tata Punch लॉंच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय देशभरातील टाटा डिलर्सकडे ही कार पोहोचली असून, नवनवे व्हिडिओ समोर येत आहेत.12 / 12एका रिपोर्टनुसार, Tata Punch ४ ट्रिम आणि १२ व्हेरिअंट्समध्ये येणार आहे. तसेच ही कार व्हाइट, ग्रे, ब्राँझ, ऑरेंज, ब्लू आणि स्टोनहेंज अशा ६ आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये येईल, असेही सांगितले जात आहे. Tata Punch मायक्रो एसयुव्ही Maruti Ignis, S-Presso, Mahindra KUV100 आणि Renault Kwid यांच्याशी स्पर्धा करेल. Tata Punch च्या लॉंचिंग डेट आणि किंमतीबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications