शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA चाच EV क्षेत्रात बोलबाला! Nexon ची विक्रीत रेकॉर्डब्रेक कामगिरी; नंबर १ कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:37 PM

1 / 9
गेल्या काही दिवसांपासून भारतीय ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडील ओढा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या चढ्या किमतींमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले असल्याचे चित्र आहे.
2 / 9
जगभरातील अनेक कार निर्माता कंपन्या पेट्रोल आणि डिझेल सोडून आता इलेक्ट्रिक मार्केटकडे वळल्या असून, आगामी पाच ते दहा वर्षांत आपली सर्व उत्पादने इलेक्ट्रिक स्वरुपातच सादर करण्याची योजना आखत आहेत.
3 / 9
भारताबद्दल बोलायचे झाले तर, इलेक्ट्रिक कार क्षेत्रात देशांतर्गत तसेच परदेशी कंपन्या आपली इलेक्ट्रिक उत्पादने एकामागून एक सादर करताना दिसत आहेत. यामध्ये टाटापासून ते अगदी एमजी मोटर्सपर्यंत अनेकविध कंपन्यांचा समावेश आहे.
4 / 9
TATA मोटर्सची इलेक्ट्रिक एसयूव्ही Nexon EV ने विक्रीत एक नवीन किमया करून दाखवली आहे. कंपनीने सांगितले की, लाँचिंग नंतर अवघ्या २ वर्षात या इलेक्ट्रिक कारने १३ हजार ५०० हून जास्त यूनिट्सची विक्री केली आहे.
5 / 9
टाटा मोटर्सने एप्रिल २०२१ मध्ये कंपनीने सांगितले होते की, कारचे चार हजार यूनिट विकले गेले आहे. याप्रमाणे एकूण १० महिन्यात नेक्सॉन ईव्हीने ९ हजार हून जास्त यूनिटची विक्री केली आहे.
6 / 9
टाटा नेक्सॉन ईव्ही देशातील सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. या कारची प्रत्येक महिन्याला एक हजार यूनिट्सची विक्री होते. टाटा मोटर्सची ही पहिली इलेक्ट्रिक कार होती. जी खासगी ग्राहकांसाठी आणली होती.
7 / 9
Tata Nexon EV ची किंमत १४.२९ लाख रुपये ते १६.९० लाख रुपये (एक्स शोरूम पर्यंत) आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही मध्ये कंपनीने 30.2 kWh च्या क्षमतेचे लिथिय आयन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅक दिले आहे.
8 / 9
टाटा मोटर्सचा दावा आहे की, इलेक्ट्रिक एसयूव्ही सिंगल चार्ज मध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ १ तासात फास्ट चार्जिंग सिस्टमने ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. तर रेग्युलर चार्जरने या बॅटरीला फुल चार्ज करण्यास ८ ते ९ तास वेळ लागतो.
9 / 9
Tata Nexon EV चा बॅटरी पॅक IP67 रेटेड वॉटर रेजिस्टेंट आहे. कंपनी याच्या बॅटरीवर ८ वर्ष, १.६ लाख किमी पर्यंत वॉरंटी देते. Nexon EV तीन कलर ऑप्शन- सिग्नेचर टील ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि मूनलाइट सिल्वर मध्ये येते. नुकतेच कंपनीने याचे एक डार्क एडिशन सुद्धा लाँच केले आहे.
टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कार