शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata च्या ग्राहकांना धक्का! 'या' दिवसापासून महागणार कार, जाणून घ्या किती वाढणार किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 3:21 PM

1 / 7
नवी दिल्ली : वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी 0.9 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. शनिवारी जारी केलेल्या निवेदनात कंपनीने आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली. वाहनाचे मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार दरवाढ वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे.
2 / 7
सरासरी किंमत वाढ 0.9 टक्के आहे. नवीन दर 7 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. कंपनीने प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जुलैमध्ये 0.55 टक्‍क्‍यांनी दरवाढ करण्यात आली होती. जेव्हा टाटा मोटर्सने नेक्सॉन ईव्ही (Nexon EV) आणि नेक्सॉन ईव्ही मॅक्सच्या (Nexon EV Max) किमती देखील वाढवल्या.
3 / 7
वाढलेल्या वाहन उत्पादन खर्चाचा मोठा भाग कंपनी उचलत आहे, परंतु एकूण इनपुट खर्चात तीव्र वाढ झाल्यामुळे काही भार ग्राहकांवर टाकणे भाग पडले आहे, असे टाटा मोटर्सने म्हटले आहे. टाटा मोटर्स सध्या टियागो, पंच, नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी मॉडेल्सची विक्री करते आणि या वाहनांचे अनेक व्हेरिएंट देखील उपलब्ध आहेत.
4 / 7
टाटा मोटर्स गेल्या काही वर्षांत सर्वात यशस्वी ऑटोमोबाईल उत्पादक बनली आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओमध्ये 157 टक्के विक्री वाढ नोंदवली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण 4,277 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली, तर एका वर्षापूर्वी याच महिन्यात 1,660 युनिट्सची विक्री झाली होती.
5 / 7
टाटा ही सध्या भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक चारचाकी उत्पादक आहे आणि या कंपनीकडे इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी लाइनअप आहे. कंपनीकडे Tigor EV, Nexon EV आणि Nexon EV Max आहेत. तसेच, Tiago EV देखील आहे, ज्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आणि सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक चारचाकी आहे.
6 / 7
गेल्या महिन्यात, टाटा मोटर्सची एकूण विक्री 15.49 टक्क्यांनी वाढून ऑक्टोबर 2022 मध्ये 78,335 युनिट्स झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने एकूण 67,829 वाहनांची विक्री केली होती. कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री 17 टक्‍क्‍यांनी वाढून 76,537 युनिट्सवर गेली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 65,151 युनिट्स होती.
7 / 7
या कालावधीत, देशांतर्गत बाजारात इलेक्ट्रिक वाहनांसह (ईव्ही) प्रवासी वाहनांची (पीव्ही) विक्री 33 टक्क्यांनी वाढून 45,423 युनिट्सवर पोहोचली आहे. ही ऑक्टोबर 2021 मध्ये 34,155 युनिट्स होती.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगbusinessव्यवसाय