शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA चा पुन्हा धुमाकूळ! फेब्रुवारीत ७३ हजार वाहनांची विक्री; ह्युंदाईसह स्पर्धक कंपन्या चितपट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 1:01 PM

1 / 9
सेमी कंडक्टर चीपच्या कमतरेतमुळे मोठ्या अडचणीत असलेल्या देशातील विविध कार उत्पादक कंपन्यानी फेब्रुवारी २०२२ या महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या घाऊक विक्रीत फेब्रुवारीमध्ये किरकोळ घट दिसून आली आहे.
2 / 9
महिंद्राच्या एकूण विक्रीत ८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. होंडा कारची घाऊक विक्री फेब्रुवारीमध्ये २३ टक्क्यांनी घसरली आहे. अशोक लेलँडच्या एकूण विक्रीत फेब्रुवारीमध्ये ७ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. ह्युंदाईच्या एकूण विक्री फेब्रुवारीमध्ये १४ टक्क्यांची घसरण झाली आहे.
3 / 9
फेब्रुवारी २०२२ मध्ये टाटा मोटर्सच्या देशांतर्गत विक्रीत २७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. टाटा मोटर्सने आपल्या वाहन विक्रीचे आकडे सादर केले. फेब्रुवारीमध्ये टाटाने एकूण देशांतर्गत ७३,८७५ युनिट्स विकले. गतवर्षी याच कालावधीत टाटाच्या वाहनांनी विक्री ५८,३६६ युनिट्स झाली होती.
4 / 9
तसेच फेब्रुवारी महिन्यात टाटा मोटर्सची देशांतर्गत बाजारात प्रवासी वाहनांची विक्री ४७ टक्क्यांनी वाढून ३९,९८१ युनिट्स झाली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात २७,२२५ युनिट्स होती. टाटाची देशांतर्गत बाजारपेठेतील व्यावसायिक वाहनांची विक्री ९ टक्क्यांनी वाढून ३३,८९४ युनिट्सवर पोहोचली, गतवर्षी याच कालावधीत ती ३१,१४१ युनिट्स होती.
5 / 9
दुसरीकडे, टाटा मोटर्सच्या EV कारची मागणी कायम आहे. फेब्रुवारी महिन्यात टाटाने २,८४६ ईव्ही कारची विक्री केली. टाटाच्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत तब्बल ४७८ टक्क्यांची मोठी वाढ दिसून आली आहे. गतवर्षी याच कालावधीत टाटाने केवळ ४९२ ईव्ही कारची विक्री केली होती.
6 / 9
टाटा आता Nexon EV फेसलिफ्ट सादर करण्याच्या तयारीत आहे. टाटा भविष्यात अल्ट्रोझ आणि पंचच्या इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याची योजना आखत आहे. टाटा यावर्षी Altroz ​​ऑटोमॅटिकसह पंच, Nexon आणि Altroz ​​च्या CNG व्हर्जन लाँच करण्यावर भर देणार आहे.
7 / 9
टाटाच्या प्रवासी वाहनांची विक्री ४१ टक्क्यांनी वाढून १,७५९ युनिट्सवर गेली. गेल्या वर्षी या कालावधीत १,२४७ युनिट्सची विक्री झाली होती. SCV कार्गो आणि पिक-अप विक्री १६,३०३ युनिट्सवर राहिली. यामध्येही ४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, गेल्या वर्षी ती १५,६०६ युनिट्स होती.
8 / 9
टाटा मोटर्सच्या नेक्सॉनने एक मैलाचा दगड पार केला आहे. कंपनीने पुण्यातील रांजणगाव प्लांटमधून तीन लाखाव्या नेक्सॉनची डिलिव्हरी साजरी केली. विशेष म्हणजे नेक्सॉनने लॉन्चच्या केवळ ८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १ लाख युनिट्सची विक्री केली. Nexon ने जून २०२१ मध्ये २ लाख युनिटचा टप्पा ओलांडला.
9 / 9
ह्युंदाईची फेब्रुवारीमधील एकूण विक्री १४ टक्क्यांनी घटून ५३,१५९ युनिट्सवर आली आहे. कंपनीने मागील वर्षी याच महिन्यात ६१,८०० युनिट्सची विक्री केली होती.
टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कार