tata motors hikes passenger vehicle prices again nexon to safari know the new price
Nexon पासून Safari पर्यंत..., Tata Motors ने गाड्यांच्या किमती वाढवल्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 2:12 PM1 / 7टाटा मोटर्सची (Tata Motors) वाहने आता महाग होणार आहेत. कंपनीने आपल्या सर्व वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी सर्व व्हेरिएंट्स आणि मॉडेल्सच्या आधारे वाहनांच्या किमतीत 0.55 टक्क्यांनी वाढ करणार आहे. नवीन दर शनिवारपासून (9 जुलै) लागू झाले आहेत. टाटाने नेक्सॉन, पंच, सफारी, हॅरियर, टियागो, अल्ट्रोज आणि टिगोरच्या किमती आजपासून वाढवल्या आहेत.2 / 7वाहने बनवण्याचा खर्च वाढल्याने किमती वाढवण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांत टाटा मोटर्सने आपल्या कारच्या किमती वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. कंपनीने एप्रिल 2022 मध्ये प्रवासी वाहनांच्या किमतीही सरासरी 1.1 टक्क्यांनी वाढवल्या होत्या.3 / 7याचबरोबर, जानेवारी 2022 मध्ये कंपनीने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती 0.9 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. आजपासून वाढलेल्या किमतीनंतर टाटाच्या नेक्सॉन, पंच, सफारी आणि टियागोसारख्या गाड्या महाग होणार आहेत. आता त्या विकत घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील.4 / 7सध्या टाटा मोटर्सची वाहने बाजारात चांगलीच कमाई करत आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीच्या जागतिक घाऊक विक्रीत 48 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने या कालावधीत एकूण 3,16,443 कारची विक्री केली आहे. यामध्ये 'जॅग्वार लँड रोव्हर' (JLR) च्या विक्रीच्या आकड्यांचा समावेश आहे.5 / 7टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तिमाहीत कंपनीच्या सर्व प्रवासी वाहनांची जागतिक विक्री 2,12,914 युनिट्सपर्यंत वाढली आहे. एका वर्षापूर्वी आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल-जून तिमाहीत 1,61,780 युनिट्सची विक्री झाली होती.6 / 7गेल्या महिन्यात सर्वाधिक पसंतीच्या कार ब्रँडच्या बाबतीत टाटा मोटर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. जून 2022 मध्ये टाटा कारच्या विक्रीत जून 2021 च्या तुलनेत 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात टाटाच्या 45,197 युनिट्स विकल्या, तर गेल्या वर्षी जून 2021 मध्ये 24,110 युनिट्सची विक्री झाली होती. कंपनीच्या नेक्सॉनला सर्वाधिक ग्राहक मिळाले आणि 14,614 कार विकल्या गेल्या.7 / 7भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्सने हॅचबॅक, एसयूव्ही आणि सेडान यांसारख्या अनेक सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च केले आहेत. कंपनीने आपले सर्वात लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल सफारी बाजारात एका नवीन स्वरूपात आणले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एंट्री-लेव्हल एसयूव्ही पंचच्या 10,414 युनिट्स आणि सफारीच्या 1,869 युनिट्सचीही विक्री केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications