शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA सह ‘या’ ६ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवरील कार करणार बंद; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 3:15 PM

1 / 9
आताच्या घडीला जगभरात वाढत चाललेल्या कार्बन उत्सर्जनाविषयी मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. कार्बन उत्सर्जनचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक देश आपपाल्या पातळीवर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे.
2 / 9
याच कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी जगातील टॉप ६ कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला असून, साधारणपणे सन २०४० पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या आपल्या कारचे उत्पादन बंद केले जाणार आहे.
3 / 9
म्हणजेच आगामी काळात या कंपन्यांच्या पेट्रोल आणि डिझेल या इंधनावर चालणाऱ्या कार जागतिक बाजारात सादर केल्या जाणार नाही. याच पार्श्वभूमीवर जगभरातील या बड्या कंपन्या आता इलेक्ट्रिक कार सेगमेंटकडे पूर्णपणे वळणार असून, आगामी सर्व उत्पादन इलेक्ट्रिक स्वरुपात सादर करणार असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 9
जगभरातील सहा बड्या कार उत्पादक कंपन्यांनी येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या तयार न करण्याचा निर्धार केला असून, यामध्ये भारतीय टाटा समूहाच्या (Tata Group) मालकीची असणारी जॅग्‍वार लँड रोव्‍हर (Jaguar Land Rover) कंपनीचाही सहभाग आहे.
5 / 9
रायटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्वीडन मधील वॉल्वो (Volvo), अमेरिकेतील फोर्ड (Ford) आणि जनरल मोटर्स (General Motors), डायमलर एजीची मर्सिडीज बेंज (Mercedes Benz), चीनमधील बीवायडी (BYD) व टाटा मोटर्स (Tata Motors) ची जॅग्‍वार लँड रोव्‍हर (Jaguar Land Rover) या कंपन्या एका करारावर स्वाक्षरी करून यासंदर्भातील योजनेला अनुमोदन देणार असल्याचे सांगितले जात आहे.
6 / 9
या करारानुसार, ग्लोबल वार्मिंग नियंत्रणात ठेवण्यासाठी सन २०४० पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन या कंपन्या पूर्णपणे बंद करणार आहेत. मात्र, या करारामध्ये सहभागी होण्यास दोन बड्या कंपन्यांनी नकार दिला आहे.
7 / 9
टोयोटा मोटर कॉर्प (Toyota Motor Corp) आणि फॉक्सवैगन एजी (Volkswagen AG) या कंपन्या यामध्ये सहभागी होणार नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. COP 26 Summit मध्ये ब्रिटनने म्हटले होते की, झिरो कार्बन उत्सर्जन करण्यासाठी या सहा कंपन्यांव्यतिरीक्त अन्य चार देशही मोहिमेत भाग घेणार आहेत.
8 / 9
मात्र, जगातील सगळ्यात मोठी कार उत्पादन करणारी कंपनी स्टेलांटिस (Stellantis), जपानची होंडा (Honda) व निसान (Nissan), जर्मनीची बीएमडब्ल्यू (BMW), दक्षिण कोरियाची हुंडई (Hyundai) या कंपन्यांनीही झिरो कार्बन उत्सर्जन मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.
9 / 9
मात्र, या मोहिमेत न्यूझीलंड आणि पोलंडसारख्या देशांचा सहभाग आहे. अमेरिका, चीनसारख्या मोठ्या कार उत्पादन करणाऱ्या देशांनी यामध्ये भाग घेण्यास साफ नकार दिल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :TataटाटाRatan Tataरतन टाटाMercedes Benzमर्सिडीज बेन्झBmwबीएमडब्ल्यूToyotaटोयोटाElectric Carइलेक्ट्रिक कार