शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata Motors चा जलवा! ‘या’ देशात एकाचवेळी केल्या ६ कार लाँच; किती आहे किंमत? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 3:55 PM

1 / 10
गेल्या अनेक महिन्यांपासून Tata ग्रुपमधील टाटा मोटर्स कंपनी दमदार कामगिरी करत आहे. केवळ भारतीय बाजारात नाही, तर शेअर मार्केटमध्येही उत्तम रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे.
2 / 10
Tata Motors ने डिसेंबर महिन्यात ह्युंदाई कंपनीला धोबीपछाड देत, विक्रीच्या बाबतीत दुसरा क्रमांकावर पटकावला. यामध्ये इलेक्ट्रिक कारचाही मोठ्या प्रमाणात वाटा असल्याचे सांगितले जात आहे. टाटा मोटर्स केवळ इथेच थांबलेली नाही. तर परदेशातील एक शेजारी देशात टाटा मोटर्सने एकाचवेळी ६ कार लाँच केल्या आहेत.
3 / 10
भारतीय बाजारात शानदार प्रदर्शन करीत असलेली Tata Motors आता भूतानमध्ये कमाल कामगिरी करण्यास सज्ज आहे. कंपनीने आपल्या पॅसेंजर गाड्यांना भूतानच्या मार्केटमध्ये उतरवले आहे.
4 / 10
Tata Motors भूतानमधील प्रवासी वाहनांचे अधिकृत डिस्ट्रीब्यूटर असलेल्या Samden Vehicles सोबत मिळून आपल्या गाड्यांना विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. भूतानमध्ये कंपनीच्या ज्या मॉडल्सच्या विक्री केली जाणार आहे त्यात Tiago, Tigor, Altroz, Nexon, Harrier आणि फ्लॅगशिप एसयूवी Safari चा समावेश आहे.
5 / 10
टाटा मोटर्सच्या या पॅसेंजर व्हीकल्सला इम्पॅक्ट २.० डिझाइन लँग्वेज अंतर्गत डिझाइन करण्यात आले आहे. जे बेस्ड सेफ्टी स्टँडर्ड सोबत शानदार परफॉर्म्सं ऑफर करीत आहे. नेक्सॉन भारतातील पहिली ५ स्टार Global NCAP रेटेड कार आहे.
6 / 10
यासह Tata Motors ची अल्ट्रोज ५ स्टार GNCAP सेफ्टी सोबत आपल्या सेगमेंटमध्ये एकटी हॅचबॅक आहे. ४ स्टार ग्लोबल एनकॅप सेफ्टी रेटिंगची टियागो आणि टिगोर आपल्या कॅटेगरीत सर्वात सुरक्षित कार आहे.
7 / 10
Tata Motors कंपनीने टाटा टियागोची सुरुवातीची किंमत ७.३४ लाख रुपये Nu (भूतानी नगुल्टम), टाटा टिगोरची सुरुवातीची किंमत ७.९९ लाख Nu, टाटा नेक्सॉनची सुरुवातीची किंमत १०.५५ लाख Nu आहे.
8 / 10
याशिवाय टाटा अल्ट्रॉजची सुरुवातीची किंमत ८.९५ लाख Nu, टाटा हॅरियरची सुरुवातीची किंमत १८.३८ लाख Nu, टाटा सफारीची सुरुवातीची किंमत २४.४२ लाख Nu आहे. भूतानची करन्सी जवळपास भारतीयाच्या रुपया इतकीच आहे.
9 / 10
भूतान आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाजार आहे. नवीन जनरेशनच्या बीएस६ पॅसेंजर व्हीकल सोबत या बाजारात आम्ही आपली जागा बनवण्यासाठी तयार आहोत.
10 / 10
आमच्या कारला तीन मुख्य पिलर्स बनवले गेले आहे. डिझाइन, सेफ्टी आणि ड्रायविंग प्लेजर. नवीन फोर एव्हर रेंज बेस्ट इन क्लास फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी सोबत येते, असे टाटा मोटर्स मध्ये पॅसेंजर व्हीकलचे हेड (इंटरनॅशनल बिझनेस) मयंक बालदीने म्हटले आहे.
टॅग्स :TataटाटाRatan Tataरतन टाटा