शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata आणतेय आणखी एक EV कार; Nexon च्या खास फिचरसह मिळेल ३०० किमीची रेंज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 4:43 PM

1 / 11
देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी असलेली Tata Motors आणखी एक इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे. नवीन इलेक्ट्रिक कारचा एक टीझरही लॉंच करण्यात आला आहे.
2 / 11
Tata Nexon EV ही आताच्या घडीला इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक खपाची कार आहे. तसेच या कारची मागणीही दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे.
3 / 11
Tata Motors आपल्या लोकप्रिय कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत असून, बेस्ट सेलिंग एसयूव्ही Tata Nexon इलेक्ट्रिक व्हेरिअंटमध्ये Tata Nexon EV लाँच केल्यानंतर आता आपली सेडान कार Tata Tigor EV रिवाइज्ड इलेक्ट्रिक व्हेरिअंटमध्ये Tata Tigor Electric लाँच करणार आहे.
4 / 11
Tata Tigor EV या कारमध्ये Tata Nexon EV प्रमाणे Ziptron Powertrain चा वापर केला जाईल, त्यामुळे ही कार बॅटरी रेंजसोबतच पॉवरच्या बाबतीतही दमदार असेल अशी शक्यता आहे.
5 / 11
तसेच Tata Tigor EV मध्ये Nexon EV प्रमाणेच Ziptron पॉवरट्रेन असेल, ज्यात ३०० पेक्षा जास्त वोल्टची इलेक्ट्रिक मोटर दिली जाईल. या कारमध्ये ३०.२ kWh ची बॅटरी मिळेल, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर २५० किलोमीटर ते ३०० किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, असे सांगितले जात आहे.
6 / 11
Tigor EV ची इलेक्ट्रिक मोटर १२० bhp पर्यंत पॉवर आणि २४० Nm पर्यंत टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल, तर या कारचा टॉप-स्पीड 100kmph पर्यंत असेल.
7 / 11
फास्ट चार्जिंग पॉइंटने बॅटरी फक्त १ तासात ८० टक्के चार्ज करता येईल. टाटा टिगोर ईव्हीच्या अपेक्षित किंमतीबाबत सांगायचं झाल्यास कंपनी ही कार १० ते १२ लाख रुपयांपर्यंत प्राइस रेंजमध्ये लाँच करू शकते, असे म्हटले जात आहे.
8 / 11
Tata Tigor EV च्या टीझरमध्ये फक्त एलॉय व्हिल्स पाहायला मिळत आहेत. समोर, LED DRLs बंपरवर दिसते. डीआरएलची रचना तुम्हाला अल्ट्रोझची आठवण करून देईल. हेडलॅम्पचे डिझाइन सारखेच आहे परंतु असे दिसते की ग्रिल नेक्सन ईव्ही सारखीच डिझाईनला सपोर्ट करेल.
9 / 11
अगदी बम्पर देखील ट्राय-एरो पॅटर्नसह येईल जे आता टाटाच्या वाहनांना एक वेगळा लूक देते. टीझर व्हिडिओमध्ये वाहन केव्हा लॉन्च केले जाईल हे स्पष्ट झाले नाही. दिवाळी दरम्यान वाहन लाँच केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
10 / 11
अलिकडेच टाटा मोटर्सने आपल्या इलेक्ट्रिक कार प्रमोट करण्यासाठी माजी फॉर्म्युला वन रेसर नारायण कार्तिकेयनशी करार केला असून नारायण टाटा मोटर्सच्या एका व्हिडिओत टाटा नेक्सॉन ईव्ही आणि टाटा टिगोर ईव्हीला प्रमोट करताना दिसत आहे.
11 / 11
दरम्यान, टाटा मोटर्सने वर्ष २०१९ मध्येच सरकारी अधिकारी आणि फ्लीट ग्राहकांसाठी Tigor EV लाँच केली होती, पण ती टिगोर इलेक्ट्रिक टिगोर बॅटरी रेंज आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत इतकी चांगली नव्हती, मात्र आता इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये पकड घट्ट करण्यासाठी नवीन मॉडलमध्ये दमदार ड्रायव्हिंग रेंज मिळेल अशी शक्यता आहे.
टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन