tata motors launched tata tiago NRG in nepal check other details with price
Tata चा जबरदस्त धमाका! लोकप्रिय हॅचबॅक कार नेपाळमध्ये लॉंच; किंमत ऐकून व्हाल अवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:53 AM1 / 10Tata मोटर्सने खरोखरच कात टाकली आहे. एकापेक्षा एक जबरदस्त कार टाटा लाँच करत आहे. यातच आता टाटाने भारतासह शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये आपली प्रसिद्ध आणि तितकीच लोकप्रिय असलेली हॅचबॅक कार लॉंच केली आहे. मात्र, याची किंमत ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.2 / 10देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Tata मोटर्सने शानदार हॅचबॅक कार Tata Tiago NRG नेपाळमधील बाजारात लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि मजबूत इंजिन क्षमतेने सजलेल्या या कारची किंमत NPR ३३.७५ लाख निश्चित करण्यात आली आहे. 3 / 10Tata Tiago NRG ची किंमत भारतीय चलनानुसार अंदाजे २१ लाख रुपयांच्या आसपास आहे. दोन महिन्यांपूर्वीच Tata ने भारतात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार Tata Nexon EV ही नेपाळमध्ये NPR ३५.९९ लाख किंमतीत लाँच केली आहे.4 / 10Tata Nexon EV ची नेपाळमधील किंमत भारतीय चलनानुसार जवळपास २२.५० लाख रुपये आहे. इतकेच नाही तर, Tata मोटर्सने आपली नवीन Tata Safari देखील लॉंच असून, किंमत NPR ८० लाख आहे. 5 / 10Tata मोटर्सने गेल्या महिन्यातच भारताच्या बाजरपेठेत आपली नवीन Tiago NRG लाँच केली होती. कंपनीने ही कार नवीन अपडेट्स आणि स्पोर्टी लूक व शानदार डिझाइनसह आणली आहे. 6 / 10Tata Tiago NRG च्या केबिनमध्ये एक रिअर-व्ह्यू कॅमेरा, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण आणि अॅपल कार-प्ले व अँड्रॉइड ऑटोचा सपोर्ट असलेली ७ इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. टियागो एनआरजीची ऑफ-रोड क्षमता चांगली ठेवण्यासाठी सस्पेन्शन रिट्यून केले आहेत.7 / 10Tata Tiago NRG मध्ये बीएस-६ मानकांसह १.२-लिटर ३-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन असून, यासोबत ट्रान्समिशनसाठी ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे. टियागो एनआरजीमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स आहेत.8 / 10Tata Tiago NRG मध्ये स्पेशल डिझाइन असलेले अलॉय व्हील, ब्लॅक फ्रंट ग्रिल, ब्लॅक डुअर हँडल, स्पोर्टी ब्लॅक क्लॅडिंग, व्हील आर्चेस व मागे टेललाइट दिली आहे. याशिवाय पुढे व मागे बंपरमध्ये फॉक्स स्किड प्लेट असून यामुळे कारला अग्रेसिव लूक मिळाल्याचे सांगितले जात आहे. 9 / 10Tata Tiago NRG फेसलिफ्टला 4-स्टार ग्लोबल एनसीएपी सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. यामध्ये ईबीडीसोबत एबीएस व ड्युअल एअरबॅग मिळतात. भारताच्या बाजारात ६.५७ लाख रुपयांपासून नवीन टियागो एनआरजीची किंमत सुरू होते. 10 / 10Tata Tiago NRG फेसलिफ्टला 4-स्टार ग्लोबल एनसीएपी सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. यामध्ये ईबीडीसोबत एबीएस व ड्युअल एअरबॅग मिळतात. भारताच्या बाजारात ६.५७ लाख रुपयांपासून नवीन टियागो एनआरजीची किंमत सुरू होते. आणखी वाचा Subscribe to Notifications