Tata Motors launches Dark Range Altroz Nexon and Nexon EV Full price list here
TATA नं लाँच केल्या प्रसिद्ध कार्सचे डार्क एडिशन्स; पाहा पूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा किती आहेत निराळ्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 6:15 PM1 / 15Tata Motors नं देशांतर्गत बाजारात आपल्या नुकतीच डार्क रेंजच्या लाँचची घोषणा केली होती. यामध्ये प्रिमिअम हॅचबॅक कार ऑल्ट्रोज, नेक्सॉन, लँड रोवर प्रमाणे तयार करण्यात आलेली प्रिमिअम एसयूव्ही हॅरिअर आणि पॅसेंजर इलेक्ट्रीक कार नेक्सॉन ईव्हगीच्या डार्क एडिशनचा समावेश आहे. 2 / 15कंपनीनं आता या गाड्यांना आपल्या डिलरशीपर्यंत पोहोचवण्यास सुरूवात केली आहे. तसंच याचं बुकिंगही सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गाड्यांसह टाटा मोटर्स काही मर्चंडाईजही सादर करत आहे. यामध्ये डार्क प्रिमिअम ब्रान्डेड जॅकेट आणि टीशर्टचा समावेश आहे. 3 / 15सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीनं यासोबत एक टायर रिपेअर किट देखील दिलं आहे. हे प्रायोरिटी कस्टमर्सना देण्यात येणार आहे. 4 / 15या कार्समध्ये खास डार्क फिनिश, ब्लॅकस्टोन, मॅट्रिक्स डॅशबोर्ड आणि प्रिमिअम अपहोल्स्ट्रीसारखे काही बदल करण्यात आले आहेत. 5 / 15त्यामुळे ही मॉडेल्स रेग्युलर मॉडेल्सपेक्षा निराळी ठरतात. तर दुसरीकडे मेकॅनिज्ममध्ये मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.6 / 15टाटाच्या डार्क एडिशनमध्ये ऑल्ट्रोज डार्कची किंमत ८.७१ लाख रूपये, नेक्सॉन डार्कची किंमत १०.४० लाख रूपये, नेक्सॉन ईव्ही डार्कची किंमत १५.९९ लाख तर हॅरिअर डार्कची किंमत १८.०४ लाख इतकी आहे. 7 / 15ऑल्ट्रोज डार्क ही देशातील सर्वात सुरक्षित प्रमिअम हॅचबॅक कार्सपैकी एक आहे. तसंच ही कार आपल्या फ्युचरिस्टीक डिझाईन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. 8 / 15ऑल्ट्रोज डार्क, नव्या टॉपलाईन व्हेरिअंट कॉस्मो ब्लॅक एक्सटीरिअर बॉडी कलरमध्ये येते. यामध्ये १६ इंचाच्या अलॉय व्हिल्सवर डार्क टिंट फिनिश देण्यात आला आहे. मेटॅलिक ग्लॉस ब्लॅक मीड पॅडसोबत ग्रॅनाईट ब्लॅक इंटिरिअर थीम आणि डीप ब्ल्यू ट्राय-एअरो परफोरेशंस आणि डेको ब्ल्यू स्टिचिंग अशा अनेक गोष्टी या कारला प्रिमिअम बनवतात.9 / 15ही कार केवळ टॉप व्हेरिअंट XZ+ मध्ये उपलब्ध असते. याशिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. 10 / 15नेक्सॉन डार्क ही कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. डार्क एडिशनमध्ये १६ इंचाचे चारकोल ब्लॅक अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. याशिवाय सॉनिक सिल्व्हरला मॅट ग्रॅनाईट ब्लॅक क्लॅडिंगसोबत बॉडीवरील हायलाईट याला स्पोर्टी लूक देतं.11 / 15या एसयूव्हीमध्ये इंटिरिअरमध्ये खास डार्क इंटिरिअर पॅक, सीट आणि डोअर ट्रिमवर ट्राय एअरो परफोरेशनसोबत प्रीमिअम लेदरेट अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. नव्या नेक्सॉनमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये XZ+, XZA+, XZ+(O) आणि XZA+(O) व्हेरिअंट उपलब्ध आहेत. 12 / 15नेक्सॉन इव्ही ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रीक पॅसेंजर कार आहे. या कारचं डार्क एडिशन दोन व्हेरिअंट्स EV XZ+ आणि XZ+ LUX मध्ये उपलब्धआहे. यामध्ये सॅटिन ब्लॅक ह्युमॅनिटी लाईन्स आणि बेल्टलाईनसोबत चारकोल ग्रे अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. 13 / 15याच्या इंटिरिअरमध्ये डार्क थीमच्या ग्लॉसी पियानो ब्लॅक मीड पॅडच्या डॅशबोर्डसह प्रीमिअम डार्त थीमच्या लेदरेट अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. या कारमध्ये टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टम, कप होल्डर्ससोबत रिअर सीट सेंट्रल आर्मरेस्ट, रिअर सीट हेडरेस्टसारखे काही फीचर्स देण्यात आले आहेत.14 / 15हॅरिअर डार्कमध्ये डार्क निळ्या रंगासह ऑल न्यू ओबेरॉन ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आलं आहे. यामध्ये १८ इंचाचे ब्लॅकस्टोन अलॉय व्हिल्स देण्यात आलेले आहेत. 15 / 15याशिवाय इंटिरिअर प्रिमिअम डार्क थीमनं सजवण्यात आलं आहे. पुढील सीटच्या हेडरेस्टमध्ये डार्क एम्ब्रॉयडरी देण्यात आली आहे. हॅरिअर डार्क एडिशन एकूण तीन ट्रिम्स XT+, XZ+ आणि XZA+ मध्ये उपलब्ध आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications